Home / महाराष्ट्र / BMC Wards : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! प्रभाग निश्चित

BMC Wards : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! प्रभाग निश्चित

BMC Wards : मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation)सार्वत्रिक निवडणुकीसाठी वॉर्ड निहाय आरक्षण सोडत आज वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात (Bal Gandharva...

By: Team Navakal
BMC Wards
Social + WhatsApp CTA

BMC Wards : मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation)सार्वत्रिक निवडणुकीसाठी वॉर्ड निहाय आरक्षण सोडत आज वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात (Bal Gandharva Rangmandir) महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर आरक्षण बदल्यामुळे इच्छुक असलेल्या काही माजी नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

सकाळी अकरा वाजता राज्यगीताने या सोडतीच सुरुवात झाली. सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या १५ वॉर्ड मधून सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी लक्ष्मी नगर मनपा स्कूलच्या (Lakshmi Nagar Municipal School) ८ विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ट्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

यंदा प्रथमच चक्रानुक्रमे आरक्षण सोडतीची पहिली निवडणूक असणार आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या सोडतीकडे होते. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांचे प्रभाग आरक्षणामुळे अनुकूल ठरले आहेत. काही इच्छुकांना मात्र सोयीचे आरक्षण न पडल्याने त्यांची उमेदवारी बाद झाली आहे.आरक्षण गेल्यामुळे राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळाल्याचे बोलले जाते.

मुंबईतील कोणते वॉर्ड कोणासाठी आरक्षित?

अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालेले वॉर्ड
१३३,१८३,१४७,१८६,१५५,११८,१५१,१८९

अनुसूचित जाती महिला – १२१

ओबीसी महिला आरक्षित वॉर्ड
५२,४६,१५८,१५०,३३,६,१२,१६७,११७,१०८,१२८,८०,१००,१९,८२,४९,९९,१७६,२१६,१९१,१७०,१३,१०५,१९८,७२,१५३,१२९,१८,१,३२,२७

अनुसूचित जमाती करिता आरक्षित प्रभाग – प्रभाग क्रमांक -५३ (पुरुष), प्रभाग क्रमांक – १२१ (महिला)

अनुसूचित जाती पुरुष– १५२,९३,२६,१४०,२१५,१४१,१४६

खुला सर्वसाधारण महिला राखीव वॉर्ड-२, ८, १४, १५, १६, १७, २४, २८, ३१, ३७, ३८, ३९, ४२, ४४, ५१, ५६, ६१, ६४, ६६, ७१, ७३, ७४, ७७, ७८, ७९, ८१, ८३, ८४, ८८, ९४, ९६, ९७, १०१, १०३, ११०, ११२, ११४, ११५, ११६, १२४, १२६, १२७, १३१, १३२, १३४, १३९, १४२, १४३, १५६, १५७, १६३, १७२, १७३, १७४, १७५, १७७, १७९, १८०, १८४, १९६, १९७, १९९, २०१, २०३, २०५, २०९, २१२, २१३, २१८, २२०, २२४, २२७.


हे देखील वाचा –

ट्रम्प यांची ‘लाडकी बहीण’ योजना! अमेरिकेतील नागरिकांना देणार 2,000 डॉलर

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये संघ गीत गाण्यावरून वाद ! चौकशीचे आदेश

सिंचन घोटाळ्याचे आरोपही खोटे ठरले ! आताही बिनबुडाचे आरोप! अजित पवार बिनधास्त

Web Title:
संबंधित बातम्या