Govt Offices Top BMC Tax Defaulters – महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या संस्थांची मालमत्ता लिलाव करण्याची वेळ पालिकेवर आली असताना पालिकेचा तब्बल १८०० कोटी ३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर सरकारी कार्यालयांनी थकवला आहे. त्याचा मोठा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर पडत असून या सरकारी संस्थांवर पालिका काय कारवाई करणार ?, याची चर्चा आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर आहे. अनेक सरकारी संस्था हा कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात शासकीय कार्यालयांनी सुद्धा मालमत्ता कर थकविल्यामुळे महापालिकेला हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.
एमएमआरडीएने ९२९ कोटी ७९ लाख ७६ हजार ८५२ रुपये, म्हाडा प्रशासननाने
३६८ कोटी ५५ लाख ८९ हजार ९६७ रुपये
मुंबई पोलीसकडून ७१ कोटी ४३ लाख ४२ हजार ६६२ रुपये,राज्य सरकारी कार्यालये २२१ कोटी ८५ लाख ७८ हजार १७ रुपये आणि केंद्र सरकारी कार्यालयांनी २०८ कोटी ६८ लाख ७६ हजार ६०२ रुपये मालमत्ता कर थकवला आहे.
पालिका सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. असे असताना मुंबईतील विविध सरकारी कार्यालयांनी महापालिकेलाच गंडा घातला आहे.
हे देखील वाचा –
मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई
केंद्र सरकारचे पुणेकरांना मोठे गिफ्ट! 1000 नव्या इलेक्ट्रिक बसेस खरेदीला मंजुरी









