Rohit Arya case : पवईतील रा स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळली. न्यायालयाने या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका (petition) मागे घेतली.ही याचिका ॲड. नितीन सातपुते यांच्या मार्फत शोभा बुद्धिवंत यांनी दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्या. अजय गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर झाली.
याचिकेत आरोप करण्यात आला होता की, रोहित आर्य यांची हत्या स्वसंरक्षण आणि प्रतिहल्ल्याच्या नावाखाली एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आली.
खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांना कायद्यानुसार दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र, थेट उच्च न्यायालयात येण्याऐवजी त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार का दाखल केली नाही? हे प्रकरण जनहित याचिकेच्या स्वरूपात ग्राह्य धरता येत नाही आणि त्यामुळे सीबीआय चौकशीचे आदेश देता येत नाहीत.
यावर याचिकाकर्त्यांनी सांगितले की, पोलिसांकडे त्यांनी लेखी तक्रार दिली होती. परंतु, न्यायालयाने नमूद केले की, पोलिसांकडे दिलेला दस्तऐवज तक्रार नसून केवळ नोटीस होती.
हे देखील वाचा –
पुणे जमीन घोटाळा! गुन्हा रद्द करा! तेजवानीची हायकोर्टात धाव
पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर
मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई









