Home / महाराष्ट्र / BJP appointed general secretary: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सरचिटणीसांची नियुक्ती

BJP appointed general secretary: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सरचिटणीसांची नियुक्ती

BJP appointed general secretary: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai municipal elections) तोंडावर भाजपाने संघटनात्मक स्तरावर हालचालींना गती दिली आहे. याच...

By: Team Navakal
BJP appointed general secretary
Social + WhatsApp CTA

BJP appointed general secretary: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai municipal elections) तोंडावर भाजपाने संघटनात्मक स्तरावर हालचालींना गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम(Amit Satam) यांनी आज सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने यावेळी नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणत राजेश शिरवडकर, प्रवक्ते गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांची सरचिटणीस म्हणून निवड केली आहे.

हे चारही नेते गेल्या काही वर्षांत पक्षाच्या विविध आघाड्यांवर सक्रिय राहिले आहेत. राजेश शिरवडकर हे मुंबई भाजपाच्या संघटनात अनुभवी पदाधिकारी आहेत. ते दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत. तर गणेश खणकर जे पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी माध्यमांमधून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी पार पाडली आहे.आचार्य पवन त्रिपाठी हे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. श्वेता परुळेकर यांनी देखील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी काम केले.

भाजपाकडून या नियुक्त्या महापालिका निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा संघटनात्मक टप्पा मानला जात आहे. सध्या मुंबईतील राजकीय समीकरणे बदलत्या दिशेने जात असताना, पक्षाने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी देतसक्रिय कार्यकर्त्यांना संघटनेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे.


हे देखील वाचा –

पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर

मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई

रोहित आर्य प्रकरणी सीबीआय चौकशीला हायकोर्टाचा नकार

Web Title:
संबंधित बातम्या