Simhastha Kumbh Mela -सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी (Kumbh Mela) आवश्यक तेवढा निधी देण्यास केंद्र आणि राज्य सरकार (State Government) कटिबध्द आहे,अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आज नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात फडणवीसांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पहिल्या टप्प्यातील ४४ विकासकामांचे, एकूण ५,६५७.८९ कोटी रुपयांच्या खर्चाचे भूमीपूजन करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा कामांचं भूमिपूजन, शिंदे-फडणवीसांची प्रमुख उपस्थिती!#nashik #kumbhmela #shinde #fadnavis #maharashtranews #bhoomipujan #eknathshinde #devendrafadnavis #politics #newsupdate #navakal #navakalnews pic.twitter.com/T6zu00AfVq
— Navakal News (@_NDN_Official) November 13, 2025
फडणवीस म्हणाले की, सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे, तर आणखी २० हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होईपर्यंत एकूण २५ हजार कोटी रुपयांची विकासकामे (Development Projects) पूर्ण होतील. कुंभमेळा दर १२ वर्षांनी येतो. त्यामुळे आम्ही दीर्घकालीन आणि शाश्वत कामांवर भर देत आहोत. गोदावरी (Godavari River) स्वच्छ आणि निर्मळ झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाटांचे बांधकाम, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, तसेच प्राचीन वारसा अबाधित ठेवण्यावर विशेष लक्ष देत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'सिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या पार्श्वभूमीवर 'रामकाल पथ विकसन करणे या कामा'चे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण केले.@Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #KumbhaMela pic.twitter.com/0TeuWmNwWB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 13, 2025
७५ वर्षांनंतर त्रिखंड योग असल्याने यंदाचा कुंभमेळा विशेष आहे. हा कुंभ दीर्घकाळ चालणार आहे. प्रयागराज येथे झालेला कुंभ हा जगातील सर्वात मोठा आस्थेचा सोहळा ठरला होता. त्याच परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ साजरा होत आहे. मागील कुंभ यशस्वी पार पडला होता, परंतु यावेळी पाचपट अधिक भाविक येणार असल्याने सुरक्षेची आणि सुविधांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे,असे फडणवीस पुढे म्हणाले.
हे देखील वाचा –
पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर
मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई









