Thamma Movie OTT Release : आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘थम्मा’ (Thamma) चित्रपट आता लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये जबरदस्त यश मिळवून जगभरात 200 कोटी रुपये रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्यानंतर, हा हॉरर-कॉमेडी चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटात थरार आणि विनोदी मनोरंजनाचा अनोखा फॉर्म्युला वापरला आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हॉरर आणि लोककथांचे मिश्रण थिएटरमध्ये चुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता होम व्ह्यूइंगसाठी उपलब्ध होणार आहे.
‘थम्मा’ ची OTT रिलीज डेट
रिपोर्ट्सनुसार, ‘थम्मा’ चित्रपट 16 डिसेंबर 2025 रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
चित्रपटाची कथा
‘थम्मा’ च्या आकर्षक ट्रेलरमध्ये प्रेम, अलौकिक शक्ती आणि भीतीची हलकीशी किनार दिसून येते. चित्रपटात आयुष्मान खुराना एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. एका अपघातानंतर त्याला व्हॅम्पायरसदृश रूप येते, तर रश्मिका मंदाना एका धाडसी महिलेची भूमिका साकारत आहे, जी त्याच्या बदलांशी जोडली जाते. शाप आणि अलौकिक अडथळ्यांचा सामना करतानाच त्यांच्यातील रोमान्स फुलतो.
लेखक निरन भट्ट, अरुण फुलारा आणि सुरेश मॅथ्यू यांनी या छोट्या शहरातील लोककथांना डार्क ह्युमर आणि अॅक्शनची जोड दिली आहे. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री, सोबत नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रभावी भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
हे देखील वाचा – US Government Shutdown : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे सरकारी शटडाउन अखेर संपुष्टात; ट्रम्प यांची खर्च विधेयकावर स्वाक्षरी









