Rupali Vs Rupali – माझ्या नेमक्या कोणत्या वक्तव्यामुळे मला शिस्तभंगाची नोटीस (Disciplinary notice) पाठविण्यात आली,असा सवाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar faction) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी पक्षाला केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)आणि रुपाली ठोंबरे यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू होता. रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांनी महिलांवरील अत्याचाराचा विविधी घटनांमध्ये घेतलेल्या भूमिकेवर रुपाली ठोंबरे यांनी सातत्याने टीका केली होती. त्यावरून पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी ७ नोव्हेंबर रोजी ठोंबरे यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल नोटीस पाठवून खुलासा मागितला होता.
https://www.facebook.com/share/p/1A68xFeszo
या नोटिशीला उत्तर देताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांच्याविषयी मी माध्यमांमध्ये व्यक्त केलेल्या मतांवरून मला नोटीस पाठविण्यात आली. पण या नोटीशीत माझे नेमके कोणते वक्तव्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे आहे याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे खुलासा करणे शक्य नाही. जर नोटिशीत माझ्या एखाद्या विशिष्ट विधानाचा उल्लेख केला असता, तर त्यावर योग्य खुलासा देणे मला शक्य झाले असते. मी केवळ एका मुद्यावर महिला आयोगाच्या भूमिकेशी असहमत होते. डॉ. संपदा मुंडे यांच्या संदर्भात आयोगाने घेतलेली भूमिका योग्य नाही, एवढेच मी म्हटले होते. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला. मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (National President Ajit Pawar)यांचा आदर राखत आणि पक्षाच्या मूल्यांचा सन्मान ठेवत माझे मत व्यक्त केले. मात्र काहींनी त्याला पक्षविरोधी रंग दिला, हा माझ्यावर झालेला अन्याय आहे.
हे देखील वाचा –
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन









