Home / महाराष्ट्र / Restrictions On Direct Sale Of Food : कंपन्या, विक्रेत्यांच्या थेट विक्रीबाबत काय आहे अन्न, नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय?

Restrictions On Direct Sale Of Food : कंपन्या, विक्रेत्यांच्या थेट विक्रीबाबत काय आहे अन्न, नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय?

Restrictions On Direct Sale Of Food : राज्यात आता उत्पादनांची थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर आता त्यांची विक्री थांबवावी...

By: Team Navakal
Restrictions On Direct Sale Of Food
Social + WhatsApp CTA

Restrictions On Direct Sale Of Food : राज्यात आता उत्पादनांची थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर आता त्यांची विक्री थांबवावी लागणार आहे अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण आता राज्यात उत्पादनांची थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर निर्बंध येणार आहेत. सद्यस्थितीत राज्य सरकारकडून थेट विक्री संदर्भात तसेच थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर देखरेख, पर्यवेक्षणाकरिता कोणतीही नियमावली अथवा मार्गदर्शक सूचना जारी केल्या नाहीत. त्यामुळे थेट विक्रीवर देखरेख ठेवण्यासाठी, पर्यवेक्षण करण्यासाठी नियम निश्चित करण्यासाठी आता एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सध्या राज्यात सद्यस्थितीत असणाऱ्या उत्पादनांची थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांना कोणत्याही स्वरुपाचे नियम सध्या नाहीत. म्हणूनच आता थेट विक्री संदर्भात तसेच थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर देखरेख, पर्यवेक्षणाकरिता कोणतीही नियमावली अथवा मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत राज्य सरकारकडून ऑक्टोंबर महिन्यात बैठकीचे आयोजन केले गेले होते.

त्यामुळेच आता थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर देखरेख, पर्यवेक्षण करण्यासाठी नियम, मार्गदर्शक सूचनांचे प्रारुप तयार करण्यासाठी या बैठकीत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय जारी करून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती अन्य राज्यांत थेट विक्री बाबत नियम, मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून राज्य सरकारला शिफारस करणार असल्याची माहिती आहे.


हे देखील वाचा –Geeta Jain slap engineer: अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या