Home / देश-विदेश / Public Holiday : १४ नोव्हेंबरला भारतातील या भागातील शाळा कॉलेजेस तसेच कार्यालय राहणार बंद..

Public Holiday : १४ नोव्हेंबरला भारतातील या भागातील शाळा कॉलेजेस तसेच कार्यालय राहणार बंद..

Public Holiday : सगळ्यांनाच माहिती आहे १४ नोव्हेंबरदिवशी बालदिन साजरा केला जातो पण या दिवशी सगळ्यांनाच सुट्टी असते असं नाही....

By: Team Navakal
Public Holiday
Social + WhatsApp CTA

Public Holiday : सगळ्यांनाच माहिती आहे १४ नोव्हेंबरदिवशी बालदिन साजरा केला जातो पण या दिवशी सगळ्यांनाच सुट्टी असते असं नाही. खर तर बालदिन म्हणजे १४ नोव्हेंबरला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली जाते. चाचा नेहरूंना लहान मुलं आवडायचे. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा दिवस खास मुलांना समर्पित करण्यात आला आहे. तस पाहायला गेलं तर बालदिनाला भारतात सामान्यतः शाळेला सुट्टी नसते, मात्र देशभरातील शाळांमध्ये हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.

या दिवशी विशेष कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जातो. काही खाजगी शाळा मुलांना सुट्टी देखील देतात, तर इतर शाळा खास कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यामुळे बालदिनाला सुट्टी आहे की नाही हे शाळेनुसार त्या त्या दिवशी कळवण्यात येते. पण भारतातील या भागात १४ नोव्हेंबरला शाळा – कॉलेजसह ऑफिसला देखील सुट्टी देण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर रोजी कोण कोणत्या शाळा कॉलेजसह कार्यालयांना सुट्टी आहे-

ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला मतदान करण्यात आले. तसेच आता १४ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबरला शाळा, कॉलेज आणि कार्यालये बंद राहणार असल्याची अधिकृत घोषणा सरकारने केली आहे.

हैदराबादचे जिल्हा दंडाधिकारी हरिचंदन दसारी यांनी ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील सर्व कार्यालयांना तसेच संस्थांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी पगारी सुट्टी देखील देण्यात येणार आहे.

ज्या कार्यालये आणि संस्थांमध्ये मतदान किंवा मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत त्यांना ही ह्या सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानात सहभागी होण्याची संधी देणे आणि लोकशाही प्रक्रिया मजबूत करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचा सरकारकडून सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी हरिचंदन दसारी यांनी सांगितलं की ही रजा प्रामुख्याने शाळांसाठी असणार आहे, कारण शिक्षक निवडणूक कर्तव्यावर असतील.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या