Home / महाराष्ट्र / Kalyan News : कल्याणमध्ये बिबट्याच्या दहशदीचे सावट..

Kalyan News : कल्याणमध्ये बिबट्याच्या दहशदीचे सावट..

Kalyan News : कल्याण सारख्या मोठ्या शहरात तालुक्यातील ग्रामीण भागत बिबट्याची दहशत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रोहण –...

By: Team Navakal
Kalyan News
Social + WhatsApp CTA

Kalyan News : कल्याण सारख्या मोठ्या शहरात तालुक्यातील ग्रामीण भागत बिबट्याची दहशत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रोहण – वाहोली परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असून या बिबट्यामुळे परिसरातील कुत्र्यांवर वारंवार हल्ले देखील होत आहे. त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

मागच्या महिनाभरापासून रोहण- वाहोली गाव परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. आता वनविभाग आणि प्राणीमित्र पथकाने बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

परिसरात प्रत्यक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून, तज्ञ अधिकारी आणि स्थानिक ग्रामसुरक्षा समिती एकत्रितपणे हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील वनविभागातर्फे करण्यात आले आहे. बिबट्याच्या सततच्या वावरत आणि सतत होणाऱ्या हल्यात काही जण मृत्युमुखी पडल्याची देखील माहिती आहे.


हे देखील वाचा –

Narayan Rane : नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी झालेल्या दंगलीतील सर्व निर्दोष

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या