Home / महाराष्ट्र / India House London : स्वातंत्र्यसैनिकांचे स्मृतीस्थळ! लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार

India House London : स्वातंत्र्यसैनिकांचे स्मृतीस्थळ! लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार

India House London : लंडनमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र राहिलेले आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह अनेक नेत्यांचे निवासस्थान असलेले...

By: Team Navakal
India House London
Social + WhatsApp CTA

India House London : लंडनमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र राहिलेले आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह अनेक नेत्यांचे निवासस्थान असलेले ‘इंडिया हाऊस’ (India House) आता महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात येणार आहे.

हे ऐतिहासिक ठिकाण स्मारकाच्या स्वरूपात जतन केले जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. लंडनमधील भारतीय नागरिकांनी या मालमत्तेचे महत्त्व सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मारक उभारण्यासाठी समितीची स्थापना

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्रालयात एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याच्या आणि त्याच्या जतन करण्याच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी एका बहु-विभागीय समितीची (Multi-departmental Committee) स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ही समिती कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर अभ्यास करून, एक सर्वसमावेशक अहवाल तयार करेल. हा अहवाल पुढील निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया हाऊस’चा ऐतिहासिक वारसा

20 व्या शतकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान म्हणून सुरू झालेले हे ‘इंडिया हाऊस’ कालांतराने वसाहतविरोधी चळवळीचे आणि भारतीय क्रांतिकारी उपक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. या मालमत्तेचे अधिग्रहण करून, वसाहतविरोधी चळवळीतील तिच्या योगदानाला ओळख देणारे भव्य स्मारक विकसित करण्याची सरकारची योजना आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकातही प्रगती

याशिवाय, मंत्री शेलार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रगतीचीही माहिती दिली. या प्रस्तावित स्मारकासाठी मुख्य बांधकामासाठी 5 एकर आणि पार्किंग व संलग्न सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा संपादित करण्यात आली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ ऑफ युनिटी’च्या धर्तीवर भव्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पहिल्या टप्प्यात मुख्य स्मारकाच्या बांधकामाला प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत.

यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने 18 व्या शतकातील मराठा सेनानी रघुजी भोसले यांची 47.15 लाख रुपये रुपये देऊन लंडनच्या लिलावातून ‘रघुजी तलवार’ विकत घेऊन ती ऑगस्टमध्ये मुंबईला परत आणली होती.

हे देखील वाचा – Pune News: नवले पुलावर भीषण दुर्घटना; 8 जणांचा मृत्यू, देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपये रुपयांची मदत केली जाहीर

Web Title:
संबंधित बातम्या