Home / लेख / तब्बल 70kmpl मायलेज! Hero Splendor Plus ला टक्कर देते ‘ही’ बाईक, किंमत 70 हजार रुपयांपासून सुरू

तब्बल 70kmpl मायलेज! Hero Splendor Plus ला टक्कर देते ‘ही’ बाईक, किंमत 70 हजार रुपयांपासून सुरू

Bajaj Platina 110 : दैनंदिन वापरासाठी किफायतशीर, टिकाऊआणि कमी देखभाल असलेल्या बाईकच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी Bajaj Platina 110 (बजाज प्लॅटिना...

By: Team Navakal
Bajaj Platina 110
Social + WhatsApp CTA

Bajaj Platina 110 : दैनंदिन वापरासाठी किफायतशीर, टिकाऊआणि कमी देखभाल असलेल्या बाईकच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी Bajaj Platina 110 (बजाज प्लॅटिना 110) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. 2025 च्या नवीनतम अपडेट्ससह आलेले हे मॉडेल बाजारातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या Hero Splendor Plus ला थेट आव्हान देत आहे.

Bajaj Platina 110 चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू म्हणजे तिचे मायलेज. एआरएआय (ARAI) नुसार, हे मायलेज 70-75 kmpl दरम्यान आहे, जे दैनंदिन प्रवासासाठी अतिशय उपयुक्त ठरते. 11 लीटरच्या इंधनटँक क्षमतेमुळे ही बाईक एकदा टँक फुल केल्यावर 700 ते 800 KM पर्यंतचा प्रवास करू शकते.

इंजिन आणि तांत्रिक तपशील

या बाईकमध्ये 115.45 cc चे इंजिन देण्यात आले आहे, जे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड आणि BS6 Phase 2 नियमांनुसार आहे. डीटीएस-आय (DTS-i) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन 8.48 bhp ची पॉवर आणि 9.81 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल (Manual) गिअरबॉक्सची सुविधा आहे आणि ही बाईक 90 kmph च्या कमाल वेगाने धावते. इंजिनमध्ये फ्यूल इंजेक्शन सिस्टमचा वापर केल्यामुळे उत्सर्जन कमी होते.

आरामदायक फीचर्स

Bajaj Platina 110 मध्ये उत्तम मायलेजसह प्रवासाचा उत्तम आराम मिळावा, यासाठी अनेक फीचर्स दिले आहेत. यात रायडर आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठी जास्त लांबीची क्विल्टेड सीट, रुंद फूटपेड्स आणि स्प्रिंग-ऑन-स्प्रिंगसह नायट्रॉक्स गॅस-चार्ज्ड मागील सस्पेंशन मिळते. सुरक्षेसाठी यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम , ट्यूबलेस टायर्स, एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट आणि नकल गार्ड्ससमाविष्ट आहेत. बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 200mm आहे.

Bajaj Platina 110 ची किंमत किती?

भारतीय बाजारपेठेत Bajaj Platina 110 ची एक्स-शोरूम किंमत 69,284 रुपये पासून सुरू होते, जी स्पर्धेत असलेल्या काही मॉडेल्सपेक्षा स्वस्त आहे.या बाईकची ऑन-रोड किंमत आरटीओ शुल्क आणि विम्याच्या रकमेसह सुमारे 86,036 रुपये इतकी होते.

हे देखील वाचा – शानदार फीचर्सचा राजा! OnePlus 15 स्मार्टफोन भारतात लाँच, मिळेल 7300mAh बॅटरी; किंमत किती?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या