Home / क्रीडा / Vaibhav Suryawanshi : आशिया कपमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं वादळ! 32 चेंडूत शतक ठोकून मोडला विक्रम

Vaibhav Suryawanshi : आशिया कपमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं वादळ! 32 चेंडूत शतक ठोकून मोडला विक्रम

Vaibhav Suryawanshi Century : दोहा येथे सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार टी20 चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या युवा संघाने...

By: Team Navakal
Vaibhav Suryawanshi Century
Social + WhatsApp CTA

Vaibhav Suryawanshi Century : दोहा येथे सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार टी20 चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या युवा संघाने संयुक्त अरब अमिरात (UAE) संघाविरुद्ध धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या फलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बिहारचा छोरा अशी ओळख असलेल्या वैभवने फक्त 32 चेंडूत शतक पूर्ण करत गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 297 धावांचा डोंगर उभा केला, ज्याला प्रत्युत्तर देताना यूएईचा संघ केवळ 149/7 धावाच करू शकला. यामुळे भारताने 148 धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे.

वैभवची झंझावाती फलंदाजी आणि विक्रम

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील 15 चेंडूत 50 धावा जोडत 32 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 9 षटकार मारले. शतकानंतरही न थांबता त्याने 42 चेंडूत 11 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 144 धावांची वादळी खेळी केली.

या शतकामुळे त्याने टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी वेगवान शतक करणाऱ्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि उर्विल पटेल (Urvil Patel) यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनी यापूर्वी 28 चेंडूत शतक झळकावले होते. रिषभ पंतचा 32 चेंडूतील शतक करण्याचा विक्रम त्याने मागे टाकला.

कर्णधार जितेश शर्माची दमदार साथ

सलामीला आलेला प्रियांश आर्य (Priyansh Arya) लवकर बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला नमन धीरची चांगली साथ मिळाली. या जोडीने 100 हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. यानंतर कर्णधार जितेश शर्मा याने जोरदार फटकेबाजी करत 32 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ अपयशी ठरला. भारताच्या गुरजपनीत सिंहयाने 3 बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पुढील सामना पाकिस्तानशी

14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग या संघांनी सहभाग घेतला आहे. या विजयानंतर भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने 16 नोव्हेंबरला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

हे देखील वाचा – Srinagar Blast : दिल्लीनंतर आता श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! 9 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Web Title:
संबंधित बातम्या