Home / देश-विदेश / Prashant Kishor : प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? बिहारमधील पराभवानंतर जुना व्हिडिओ व्हायरल

Prashant Kishor : प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? बिहारमधील पराभवानंतर जुना व्हिडिओ व्हायरल

Prashant Kishor Bihar Election : देशातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना...

By: Team Navakal
Prashant Kishor
Social + WhatsApp CTA

Prashant Kishor Bihar Election : देशातील अनेक यशस्वी राजकीय नेत्यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये स्वतःच्याच घरात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील जन सुराज पक्षाने (JSP) राज्यातील सर्व 243 जागांवर उमेदवार उभे केले, पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

पराभवानंतर प्रशांत किशोर यां;चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलहोत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले होते की, जर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने 25 पेक्षा जास्त जागा जिंकल्या, तर ते राजकारण सोडतील. एनडीएने (NDA) 178 जागा जिंकल्यामुळे प्रशांत किशोर आता आपले वचन पाळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जन सुराज पक्षाची निराशाजनक कामगिरी

निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांच्या विरोधात राघोपूर मतदारसंघातून लढण्याची शक्यता असतानाही, प्रशांत किशोर यांनी ‘पक्षाच्या मोठ्या हितासाठी’ माघार घेतली होती. टीकाकारांच्या मते हा निर्णय त्यांना खूप महागात पडला.

जन सुराज पक्षाने 243 पैकी 238 जागांवर उमेदवार उभे केले. या पक्षाला 15 लाख मते मिळाली, जे एकूण मतदानाच्या केवळ 3% आहे. पक्षाचे 116 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर 122 उमेदवारांना तिसऱ्या स्थानाखाली समाधान मानावे लागले. 32 उमेदवारांनी 10 हजारांहून अधिक मते मिळवली. मात्र, राज्यभर केलेल्या मोठ्या प्रचारानंतरही हा निकाल निराशाजनक ठरला.

रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह

जन सुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मान्य केले. पक्ष आपली भूमिका प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकला नाही, असे ते म्हणाले. सुरुवातीला काही जागांवर मिळालेली आघाडी एक्झिट पोलच्या (Exit Poll) अंदाजानुसार त्वरित संपुष्टात आली. प्रशांत किशोर यांनी या निकालावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एनडीएला मोठा विजय बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये NDAने एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महागठबंधनला 50 चा आकडाही पार करता आला नाही. भाजपला 89 तर जेडीयूला 85 जागा मिळाल्या.

हे देखील वाचा – Bihar Election Results : नदीत उड्या, डान्स केला पण… बिहार निकालावरून फडणवीसांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

Web Title:
संबंधित बातम्या