Google Pixel 10 Discount : Google च्या अत्याधुनिक फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट पाहत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात नुकताच आलेला Google Pixel 10 आता बंपर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon ने या फोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे, ज्यामुळे हा प्रीमियम स्मार्टफोन आता सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे.
79,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च झालेला Pixel 10 अत्यंत कमी वेळेत इतक्या मोठ्या सवलतीत उपलब्ध होणे, ही एक दुर्मिळ संधी आहे. स्टॉक संपेपर्यंत ही ऑफर उपलब्ध राहील, त्यामुळे खरेदी करण्यास विलंब करू नका.
Google Pixel 10 वर नेमकी काय ऑफर आहे?
Google Pixel 10 च्या Indigo रंगाच्या, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर Amazon 11,721 रुपयांची थेट सवलत देत आहे. या सवलतीनंतर फोनची किंमत 79,999 रुपयांवरून कमी होऊन 68,278 रुपये झाली आहे. याशिवाय, ग्राहक निवडक क्रेडिट कार्ड्सवर अतिरिक्त सवलत मिळवू शकतात आणि आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून एकूण किंमत आणखी कमी करू शकतात.
Pixel 10 ची खास तांत्रिक वैशिष्ट्ये
दमदार प्रोसेसर: Google Pixel 10 मध्ये कंपनीने Tensor G5 चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.
बॅटरी आणि चार्जिंग: यात 4,970mAh क्षमतेची बॅटरी असून, 30W फास्ट चार्जिंगला आणि 15W पर्यंत वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
उत्कृष्ट डिस्प्ले: फोनमध्ये 6.3-इंच चा OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी Corning Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शन दिले आहे.
कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी, Pixel 10 मध्ये 48MP चा मेन सेन्सर आहे, जो मॅक्रो फोकस कॅप्चर करतो. यात 13MP चा अल्ट्रावाइड लेन्स आणि 10.8MP चा टेलीफोटो लेन्स आहे, जो 5x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. समोर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10.5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Vaibhav Suryawanshi : आशिया कपमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं वादळ! 32 चेंडूत शतक ठोकून मोडला विक्रम









