CJI B R Gavai : सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज हे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालते आणि याच भाषांमध्ये युक्तिवाद केला जातो. मात्र, महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर आज एका याचिकाकर्त्याने थेट मराठी भाषेत युक्तिवाद करण्याची मागणी केली. या अप्रत्याशित मागणीमुळे न्यायालयात एक मनोरंजक प्रसंग घडला.
न्यायमूर्ती गवई हे गेल्या 6 महिन्यांपासून देशाचे सरन्यायाधीश असून, ते येत्या 24 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
कोर्टात झालेला ‘तो’ महत्त्वाचा संवाद
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती बिश्नोई यांच्या विभागीय खंडपीठासमोर याचिकाकर्त्याने मराठीतून युक्तिवाद सुरू करताच, सरन्यायाधीश गवई यांनी त्याला थांबवले आणि हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलण्याची सूचना केली.
सरन्यायाधीश गवई यांनी याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “तुम्ही एकाच न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर नाही आहात. हे एक विभागीय खंडपीठ आहे आणि माझ्या सहकारी न्यायमूर्तींना मराठी समजत नाही.” त्यामुळे कोर्टाचे कामकाज राष्ट्रीय स्तरावरील भाषांमध्ये चालवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर याचिकाकर्ता भावूक झाला. त्याने त्वरित हिंदीमध्ये युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली आणि म्हटले, “मला हिंदीमध्ये युक्तिवाद करण्यात कोणतीही अडचण नाही. मला फक्त तुमच्या कार्यकाळात न्याय मिळाला पाहिजे.”
A litigant seeks to address a bench of CJI BR Gavai and Justice Bishnoi in Marathi
— Bar and Bench (@barandbench) November 14, 2025
Litigant submits in Marathi
CJI: you are not before a single judge bench, this is a division bench. Argue in english or hindi ..my brother does not understand Marathi.
Litigant: I have no… pic.twitter.com/pxzkfvzmnK
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा थोडक्यात परिचय
न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी मे 2025 मध्ये भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी असून, त्यांचे वडील दिवंगत आर. एस. गवई हे सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल होते. 16 मार्च 1985 रोजी बार कौन्सिलमध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर काम केले. ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील.
हे देखील वाचा – IPL Trade : संजू सॅमसन CSK मध्ये तर रवींद्र जडेजाची RR मध्ये घरवापसी, जाणून घ्या किती मध्ये झाली ट्रेड डील?









