Home / लेख / Activa ला विसरा! Honda ची ‘ही’ स्कूटर आहे खूपच जबरदस्त; किंमत फक्त 70 हजार रुपयांपासून सुरू

Activa ला विसरा! Honda ची ‘ही’ स्कूटर आहे खूपच जबरदस्त; किंमत फक्त 70 हजार रुपयांपासून सुरू

Honda Dio 110 Details : स्कूटर बाजारात Honda Activa 110 ची ओळख घरोघरी असली तरी आता त्याच कंपनीची Honda Dio...

By: Team Navakal
Honda Dio 110
Social + WhatsApp CTA

Honda Dio 110 Details : स्कूटर बाजारात Honda Activa 110 ची ओळख घरोघरी असली तरी आता त्याच कंपनीची Honda Dio 110 ही स्कूटर आपल्या स्पोर्टी डिझाईन आणि दमदार कार्यक्षमतेमुळे तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. Activa पेक्षा सुमारे 5,000 रुपयांनी स्वस्त असलेली ही स्कूटर किंमत, मायलेज आणि स्टाईल यांचा एक उत्तम संगम आहे.

किंमत आणि इंजिन पॉवर

Honda Dio 110 दोन मुख्य व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹69,096 आहे, तर DLX व्हेरिएंटची किंमत ₹79,973 आहे. Honda Activa 110 ची सुरुवातीची किंमत ₹74,619 असल्याने, Dio 110 सुमारे ₹5,000 स्वस्त आहे.

Dio 110 मध्ये 109.51cc चे फ्यूल-इंजेक्टेड, एअर-कूल्ड इंजिन बसवले आहे. हे इंजिन 7.65 bhp इतकी पॉवर आणि 9 Nm टॉर्क निर्माण करते. सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे शहरात स्कूटर चालवणे अत्यंत सोपे होते.

मायलेज आणि आधुनिक तंत्रज्ञान

मायलेजच्या बाबतीतही Honda Dio 110 मागे नाही. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर 48 ते 55 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. 5.3 लीटरच्या इंधन टाकीमुळे एकदा पूर्ण भरल्यावर ती 250 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

या स्कूटरमध्ये eSP (Enhanced Smart Power) तंत्रज्ञान आहे, जे स्मूद रायडिंगचा अनुभव देते. तसेच, याची सर्वात खास गोष्ट म्हणजे सायलेंट स्टार्ट सिस्टम (ACG), ज्यामुळे इंजिन कोणताही आवाज न करता सुरू होते. फ्यूल इंजेक्शन प्रणालीमुळे पॉवर सातत्याने मिळते. या स्कूटरचा कमाल वेग सुमारे 83 किमी/तास आहे, जो हायवेसाठी देखील पुरेसा आहे.

2025 Honda Dio 110 मध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. यात स्पोर्टी ग्राफिक्स, एलईडी हेडलॅम्प, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) आणि ट्यूबलेस टायर मिळतात. विशेष म्हणजे, यात 4.2-इंच चा TFT देण्यात आला आहे, जो रिअल-टाईम मायलेज, सरासरी मायलेज, इंधन नसल्यावर किती अंतर कापेल याची माहिती आणि बॅटरी इंडिकेटर दाखवतो.

हे देखील वाचा – IPL Trade : संजू सॅमसन CSK मध्ये तर रवींद्र जडेजाची RR मध्ये घरवापसी, जाणून घ्या किती मध्ये झाली ट्रेड डील?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या