Mumbai Municipal Election : बिहार निवडणुकीत भाजपचा विजय झाला मात्र काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला. आणि आता याचे परिणाम देखील राज्याच्या राजकारणावर होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या स्तरातून यावर चर्चा केली जात आहे. आणि आता याच पार्शवभूमीवर काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी (माविआ) सोबत एकत्र न लढता स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी देखील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यालाच अनुसरून आज झालेल्या मुंबई काँग्रेसच्या शिबिरात यावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील सर्व वार्डांमध्ये काँग्रेस उमेदवार उभे करण्याची तयारी असलयाचे देखील मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. आज महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिबीर संपन्न झाले. या शिबिरातच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लक्ष्य २०२६ साठी मुंबई काँग्रेसचे आज शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर आघाडीबाबत निर्णय घ्यावा असं पक्षाने आम्हाला कळवलं होते. पुढे त्या म्हणतात आज आमचे AICC प्रभारी रमेश चेन्नीथला हे इथे उपस्थित आहेत. येत्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही या आघाडीबाबत अधिक चर्चा करू असं त्यांनी सांगितले.
पण अखेर प्रश्न उरतो तो वेगळाच बिहारच्या निवडणुकीनंतर हा निर्णय घेतला असावा का? राजकीय वर्तुळात मात्र यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती काँग्रेसला खटकली का? परंतु याबातच कुठला हि दावा अद्याप काँग्रेसकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावेळीच्या निवडणुकीत कोण कोणावर भारी पडणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा –









