Kedarnath Yatra – उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात (Kedarnath temple) या वर्षी बाबा केदारच्या (Baba Kedar) दर्शनासाठी १७.६८ लाख लोकांनी भेट दिली. या विक्रमी गर्दीमुळे परिसरात २,३०० टन कचऱ्याचा प्रचंड डोंगर जमा झाला आहे. प्रत्येक यात्रेकरू मागे सरासरी १.५ किलो कचरा (Garbage) मागे सोडला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रति यात्रेकरू कचर्यात १५० ग्रॅमने वाढ झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे, ज्यामुळे हिमालयातील या शिवमंदिरासाठी एक नवीन पर्यावरणीय आव्हान निर्माण झाले आहे. केदारनाथ धाम (Kedarnath Dham)संवेदनशील क्षेत्र असल्याने येथे कचरा जाळण्यास मनाई आहे, तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सुविधाही नाही. यंदा गोळा झालेल्या कचऱ्यात अंदाजे १०० टन प्लास्टिक, तर २,२०० टन इतर कचरा होता, जो गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावर पसरलेला होता.
यात्रेदरम्यान गोळा झालेला सर्व कचरा खेचरांच्या माध्यमातून सोनप्रयाग येथे विल्हेवाटीसाठी आणला जातो. एक खेचर केवळ १०–१२ किलो कचरा (10–12 kg of waste)वाहू शकते. एका फेरीचा खर्च १,७०० रुपये येतो. त्यामुळे कचरा सोनप्रयागपर्यंत (Sonprayag) नेण्यासाठीच अंदाजे २५ कोटी रुपये खर्च होत आहेत.
हे देखील वाचा –
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कामिनी कोशल यांचे निधन
यंदा मुंबईत महापौर शिवसेनेचाच; मातोश्रीबाहेर शिंदे गटाचे बॅनर









