Home / लेख / BSNL ने सिल्व्हर ज्युबिली निमित्त ग्राहकांना दिले हे गिफ्ट! सादर केला फक्त ₹225 चा प्लॅन; पाहा फायदे

BSNL ने सिल्व्हर ज्युबिली निमित्त ग्राहकांना दिले हे गिफ्ट! सादर केला फक्त ₹225 चा प्लॅन; पाहा फायदे

BSNL Silver Jubilee Plan : सरकारी दूरसंचार क्षेत्रातील कंपनी BSNL (बीएसएनएल) ने आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त एक अतिशय आकर्षक...

By: Team Navakal
BSNL Silver Jubilee Plan
Social + WhatsApp CTA

BSNL Silver Jubilee Plan : सरकारी दूरसंचार क्षेत्रातील कंपनी BSNL (बीएसएनएल) ने आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त एक अतिशय आकर्षक आणि किफायतशीर प्लानबाजारात आणला आहे. ‘सिल्व्हर ज्युबिली’ (Silver Jubilee) या नावाने सादर केलेला हा प्लान ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, हाय-स्पीड डेटा, दररोज मोफत एसएमएस आणि राष्ट्रीय रोमिंग यांसारख्या सेवांचा लाभ देतो.

सातत्याने नवनवीन आणि स्वस्त प्लान्स आणल्यामुळे BSNL च्या ग्राहकसंख्येत वाढ होत असून, कंपनी खासगी ऑपरेटर्सला जोरदार स्पर्धा देत आहे.

‘सिल्व्हर ज्युबिली’ प्लानचे खास वैशिष्ट्ये

BSNL चा हा नवीन प्रीपेड (Prepaid) रिचार्ज प्लान फक्त ₹225 मध्ये उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना खालील फायदे मिळतात:

  • अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगची सुविधा
  • दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा
  • दररोज 100 मोफत एसएमएस
  • याव्यतिरिक्त, यात BiTV चा ॲक्सेस मिळतो, ज्यामुळे ग्राहक 350 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा आनंद घेऊ शकतात.

₹1 चा विशेष ऑफर

BSNL कडून नवीन ग्राहकांसाठी ₹1 चा एक विशेष रिचार्ज ऑफर सुद्धा देण्यात आला आहे, जो 18 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे. ही ऑफर यापूर्वी 15 ऑगस्ट आणि दिवाळीच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आला होतू. या ऑफरमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळते, सोबतच:

  • दररोज 2GB हाय-स्पीड डेटा
  • अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंग
  • दररोज 100 मोफत एसएमएस

TRAI (ट्राय) च्या ताज्या आकडेवारीनुसार, BSNL ने बाजारात आणलेल्या अशा आकर्षक प्लान्समुळेच कंपनीचा ग्राहक आधार सातत्याने वाढत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या