Sandeep Deshpande – आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड (MP Varsha Gaikwad) आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष (Mumbai President)संदीप देशपांडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. मनसेच्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्या गायकवाडांना देशपांडेंनी तोंडाला आवर घालण्याचा खोचक टोला लगावला आहे.
मनसेच्या कार्यशैलीवर टीका करताना खासदार वर्षा गायकवाड यांनी मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, असे विधान केले होते. यावरच मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज काँग्रेसवर (Congress) थेट पलटवार केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसने कोणाला मारले, कोणाला झोडले, कोणाला ठेवले, हा सर्व काँग्रेसचा इतिहास आहे. त्यामुळे वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा.
काँग्रेसने मारहाण करणाऱ्या पक्षासोबत युती करणार नसल्याच्या वक्तव्यावर देशपांडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी विचारले की, आम्ही काँग्रेसला कधीही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता. मग त्यांना आमंत्रण दिलेच कोणी?
बिहार निवडणुकीतील अपयशावरून काँग्रेसने दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, काँग्रेसने कालच मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्याच दुसऱ्याच दिवशी काँग्रेस आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.
हे देखील वाचा –









