Home / News / NPP Enters Maharashtra : ईशान्येकडील एनपीपी पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश

NPP Enters Maharashtra : ईशान्येकडील एनपीपी पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश

NPP Enters Maharashtra – ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर आणि नागालँडसह अनेक राज्यांत मजबूत पकड असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या...

By: Team Navakal
NPP Enters Maharashtra
Social + WhatsApp CTA

NPP Enters Maharashtra – ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर आणि नागालँडसह अनेक राज्यांत मजबूत पकड असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या राष्ट्रीय पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रवेश केला आहे.

आदिवासीबहुल भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची घोषणा एनपीपीने केली आहे. एनपीपी हा भाजपा प्रणित एनडीए आघाडीचा भाग आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असलेले लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये संगमांनी मेघालयमध्ये आदिवासी प्रश्नांसाठी एनपीपी पक्षाची स्थापना केली होती.

संगमा यांचे सुपुत्र आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोरांड संगमा यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला २०१९ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मेघालयचे मुख्यमंत्री संगमा यांनी दिल्ली येथील बैठकीत अमित वेळूकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. वेळूकर यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यातून पक्षविस्ताराला सुरुवात केली आहे.


हे देखील वाचा –

वर्षाताई तोंडाला आवर घाला! संदीप देशपांडेंचा खोचक टोला

नवी मुंबई विमानतळ टेक-ऑफ साठी सज्ज! तिकीट बुकिंग सुरू होणार, पहिली फ्लाईट या तारखेला उड्डाण घेणार

लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्याची मुदत जवळ आली, त्वरित पूर्ण करा प्रक्रिया; जाणून घ्या प्रोसेस

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या