Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis:विरोधकांची पुन्हा माती होणार!मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis:विरोधकांची पुन्हा माती होणार!मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर होते. यावेळी ते म्हणाले की, विरोधक सातत्याने आरोप करतात,...

By: Team Navakal
Devendra Fadnavis
Social + WhatsApp CTA

 Devendra Fadnavis- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर होते. यावेळी ते म्हणाले की, विरोधक सातत्याने आरोप करतात, पण न्यायालय किंवा निवडणूक आयोग पुरावे मागतो तेव्हा त्यांच्याकडे एकही पुरावा नसतो. आतापर्यंत हवेत गोळीबार करणार्‍यांना आता जमीन दिसली आहे, तरीही ते सुधारत नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही त्यांची माती होणार आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी हे कार्यालय असणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की,  बिहारच्या जनतेने मोदी आणि नितीशकुमार यांच्या सुधारणांवर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपडा साफ केला. याबद्दल मी बिहार जनतेचे आभार मानतो. भाजपाचा विजयाचा रथ सातत्याने पुढे जात आहे. आम्ही विरोधकांचे फेक नरेटिव्ह हाणून पाडले आहे. नेमके काय झाले ते विरोधकांना जनतेत गेल्यावर कळेल. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची पुन्हा हीच परिस्थिती होणार आहे.


मराठवाड्यात सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. शेतकर्‍यांवर संकट आल्यावर राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले तेव्हा अंबादास दानवे त्यांच्यासाठी माणसे शोधत होते. लोकांना माहिती आहे की, यांच्याकडे काही नाही. आपल्याला प्रत्येक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक

वर्षाताई तोंडाला आवर घाला! संदीप देशपांडेंचा खोचक टोला

भटक्या कुत्र्यांवरील कारवाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या