Home / देश-विदेश / Chandrayaan 4 : चंद्रावरून माती घेऊन परत येणार! इस्रोच्या ‘चांद्रयान-4’ मोहिमेची तारीख जाहीर  

Chandrayaan 4 : चंद्रावरून माती घेऊन परत येणार! इस्रोच्या ‘चांद्रयान-4’ मोहिमेची तारीख जाहीर  

Chandrayaan 4 : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO चांद्रयान-3 च्या यशानंतर आता एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि विशाल प्रकल्पावर काम...

By: Team Navakal
Chandrayaan 4
Social + WhatsApp CTA

Chandrayaan 4 : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO चांद्रयान-3 च्या यशानंतर आता एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि विशाल प्रकल्पावर काम करत आहे. इस्त्रोने चांद्रयान-4 मोहीम 2028 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या मोहिमेद्वारे शिवशक्ती लँडिंग साइटजवळील चंद्रावरील सुमारे 3 किलो वजनाचे मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणले जातील. याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याचा पराक्रम करणारे अमेरिका, रशिया आणि चीन या निवडक राष्ट्रांच्या यादीत भारत लवकरच सामील होईल.

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी या योजनांची माहिती दिली. सध्याच्या आर्थिक वर्षात इस्रोचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे, यात व्यावसायिक उपग्रह आणि अनेक PSLV व GSLV रॉकेट प्रक्षेपणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) यांच्या भागीदारीतून भारतीय कंपन्यांनी पूर्णपणे तयार केलेले पहिले PSLV प्रक्षेपित करेल.

भारताचे ‘भारतीय अंतराळ स्थानक’ आणि गगनयान

  • अंतराळ स्थानक: इस्रो 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे ‘भारतीय अंतराळ स्थानक’ पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत आहे. या स्थानकाचा पहिला मॉड्यूल 2028 पर्यंत प्रक्षेपित करण्याची योजना आहे. हे स्थानक कार्यान्वित झाल्यास अमेरिका आणि चीननंतर हे स्थानक चालवणारा भारत हा जगातील तिसरा देश बनेल.
  • गगनयान आणि चांद्रयान: मानवी अंतराळ मोहीम गगनयान (Gaganyaan) आपल्या निश्चित वेळेनुसार सुरू आहे. 2027 मध्ये होणाऱ्या पहिल्या मानवी मोहिमेपूर्वी 3 मानवरहित चाचणी उड्डाणे पूर्ण केली जातील. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचे मोठे उद्दिष्ट इस्रोला दिले आहे.

खासगी क्षेत्र आणि अंतराळ अर्थव्यवस्था

इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी विस्तारामुळे भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. सध्या ही अर्थव्यवस्था सुमारे 8.2 अब्ज डॉलर्सची असून, ती 2033 पर्यंत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढल्यामुळे 450 हून अधिक उद्योग आणि 330 स्टार्टअप्स या अंतराळ परिसंस्थेचा (Ecosystem) भाग बनले आहेत. इस्रोने पुढील 3 वर्षांत उपग्रहांचे वार्षिक उत्पादन तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हे देखील वाचा – MSRTC Bus Concession : राज्य सरकारची मोठी भेट! विद्यार्थ्यांना सहलींसाठी बसच्या भाड्यात मिळणार 50 टक्के सवलत

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या