Home / महाराष्ट्र / Marathi Hindi Language Row : ‘महाराष्ट्रात राहून मराठी येण्याची काय गरज?’ नालासोपारा लोकलमधील भाषिक वादाचा व्हिडिओ व्हायरल

Marathi Hindi Language Row : ‘महाराष्ट्रात राहून मराठी येण्याची काय गरज?’ नालासोपारा लोकलमधील भाषिक वादाचा व्हिडिओ व्हायरल

Marathi Hindi Language Row : मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करताना होणारी धक्काबुक्की काही नवीन नाही. गर्दीच्या वेळी होणारी धक्काबुक्की नेहमीची...

By: Team Navakal
Marathi Hindi Language Row
Social + WhatsApp CTA

Marathi Hindi Language Row : मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करताना होणारी धक्काबुक्की काही नवीन नाही. गर्दीच्या वेळी होणारी धक्काबुक्की नेहमीची असली तरी, सध्या व्हायरल होत असलेल्या एका घटनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये उभे राहण्याच्या जागेवरून सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट मराठी भाषेच्या वापरावरून संघर्षात बदलला.

सनी चव्हाण नावाच्या एका तरुणाने हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला असून, त्या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे. चव्हाण यांनी सांगितल्यानुसार, सकाळी फलाट क्रमांक 2 वर ट्रेनमध्ये चढत असताना एका अमराठी प्रवाशाचा धक्का लागला. या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली, जी पुढे भाषिक वादात रूपांतरित झाली.

‘मराठी का येत नाही?’ प्रश्नावर आक्षेपार्ह प्रतिवाद

या वादात जेव्हा मराठी तरुणाने अमराठी प्रवाशाला “तुम्हाला मराठी का येत नाही?” असा जाब विचारला, तेव्हा समोरच्या तरुणाने दिलेले उत्तर अतिशय आक्षेपार्ह होते. स्वतः ठाण्यात लहानाचा मोठा झाल्याचे सांगणाऱ्या त्या अमराठी तरुणाने उद्धटपणे विचारले, “मला मराठी बोलता येत नाही तर काय झाले? महाराष्ट्रात राहायला मराठी येण्याची काय गरज आहे?”

हे उत्तर ऐकून वादाने अधिकच टोक गाठले. ‘मला हात लावायचा नाही’ असे एक तरुण वारंवार सांगत असतानाही वाद थांबला नाही. मुंबईतील लोकल ट्रेनमधील अशा प्रकारच्या भाषिक तणावामुळे, विशेषतः वसई-विरार पट्ट्यात, परप्रांतीय स्थलांतरामुळे स्थानिकांच्या अस्मितेचा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे.

मराठी प्रवाशांकडून त्वरित विरोध

लोकलमध्ये उपस्थित असलेल्या इतर मराठी प्रवाशांनी त्वरित या भाषिक अनादरावर प्रतिक्रिया दिली. “हा महाराष्ट्र आमचा आहे आणि येथे मराठी बोलता आलेच पाहिजे,” असे ठामपणे सांगत अनेक प्रवाशांनी मराठी तरुणाच्या बाजूने उभे राहत अमराठी तरुणाला विरोध केला.हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या