Home / देश-विदेश / Delhi Blast : दिल्लीतील भ्याड हल्ल्याला जवाबदार कोण?

Delhi Blast : दिल्लीतील भ्याड हल्ल्याला जवाबदार कोण?

Delhi Blast : भारताने आजवर अनेक हल्ले पचवले अर्थात त्यामध्ये अनेक जीव गेले. २६/११ चा हल्ला तर इतका भीषण होता...

By: Team Navakal
Delhi Blast
Social + WhatsApp CTA

Delhi Blast : भारताने आजवर अनेक हल्ले पचवले अर्थात त्यामध्ये अनेक जीव गेले. २६/११ चा हल्ला तर इतका भीषण होता कि यात जवळपास १६६ लोक मारले गेले आणि ३०० हुन अधिक लोक जखमी होते. पण हे इथेच थांबले नाही भारत बऱ्याचदा छोट्या मोठ्या हल्ल्यांनी का होईना सतत दहशद वाद्यांचा लक्ष बनला. आणि आता नुकत्याच झालेल्या भ्याड हल्यात १३ जण ठार झाल्याचे काही अहवालातून स्पष्ट झाले. पण अजूनही याला दहशवादी हल्ला म्हणावा का यावर देखील संभ्रम आहे. पण मुद्दा फक्त एवढाच नाही आहे. भारतातील हे भ्याड हल्ले भारताच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचवता आहेत.

या आधी झालेला पुलवामा हल्ला असो किंवा पहलगाम हल्ला असो भारताच्या सुरक्षतेचा प्रश्न कायमच चव्हाट्यावर आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी आणि शहाणी आक्रमक होत यावर कठोर भूमिका घेतली देखील. ज्याचं प्रचंड कौतुक देखील आहे. जेव्हा हा हल्ला झाला होता तेव्हा शहाणी आणि मोदींनी ती परिस्थिती एकदम उत्तम रित्या सांभाळी अर्थात त्यांची राष्ट्रा विषयीची तळमळ देखील यात दिसली. पण तरीही इतकं सगळं असून देखील भारतातवर परत हल्ला करायची हिम्मत हि झालीच. आणि आता या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षितेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह आहेच.

दिल्लीतील लालकिल्ल्याजवळ झालेला हा स्फोट भयावह होता. पण खरच दशवाद्यांना जराही भीती राहिली नाही आहे का? पण दिल्लीत लालकिल्ल्याजवळ झालेला हा स्फोट मात्र मोदी सरकारसाठी नामुष्की होती. दिल्लीत देखील डबल इंजिन’ सरकार काम करत, पण तरीही दिल्लीत गर्दीच्या वेळी लालकिल्ल्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हा स्फोट होत असेल तर याला जवाबदार कोण? तस पाहायला गेलं तर दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. कितीही उपदेश देत म्हटलं कि आम्ही तुमच्या दुखत सहभागी आहोत तरीही ज्यांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे त्यांच्या दुःखाची कणभर देखील अनुभूती आपल्याला येणार नाही. शेवटी मृतांच्या नातेवाकिकांना आधार देणं हेच आपल्या हातात आहे हे कितीही सत्य असलं तरीही हा हल्ला या भारताचं बनलेले आजून एक कटू सत्य आहे.

पण तरीही दिल्लीतील या भ्याड हल्ल्याला काय म्हणावं ‘दहशतवादी हल्ला’ होता की केवळ दुर्दैवी ‘दहशतवादी घटना’? असे म्हटले जाते की, दिल्लीतील स्फोट घडवून आणणारे सगळे सुशिक्षित काश्मिरी होते.आता काश्मीर हा भाग पूर्णपणे भारतात आलेला आहे. ते सगळे कथित दहशतवादी भारतीय आहेत. आणि त्यातीलच एका दहशदवाड्याने स्फोट घडवून आणला. पण तसे पहायला गेले तर ते भारतीय आहेत, पाकिस्तानी नाहीत. पण हे भारतातीलच कथित भारतीय भारताच्या जीवावर का उठतलेत याच्या मुळाशी जाणे अधिक महत्वाचे आहे. अशीच दहशदवादी वृत्ती वाढत राहिली तर येणार भविष्य हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच विकासाच्या दृष्टीने धोकादायक ठरेल. याला आळा घालणे अत्यंत महत्वाचे. झालेल्या हल्ल्याबाबत अधिक स्पष्टता मिळणे हा भारतीय जनतेचा अधिकार आहे. आणि प्रशासनाने त्यावर लवकरत लवकर पावलं उचलणे हे त्यांचे कर्तव्य आहे. झालेल्या हल्ल्यातुन भारताला बाहेर काढणे गरजेचेच पण हि विकृत वृत्ती कधी संपणार यावर प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.


हे देखील वाचा – US Tariff Exemption : अमेरिकेने 250 हून अधिक उत्पादनांवरील शुल्क रद्द केले; भारताला किती फायदा होणार?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या