Winter In Maharashtra : बदलणारे ऋतू आणि हवामान यामुळे राज्यात सर्दी ताप कायम आहे आता राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. किमान तापमानात होणारी लक्षणीय घट देखील जाणवू लागली आहे. याच बरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हुडहुडी कायम आहे. थंडीपासून सौरक्षण करण्यासाठी शेकोट्या देखील पेटवल्या जात आहेत.

बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १५ अंशांच्या देखील खाली गेला असल्याचे चित्र आहे. आज करमाळ्यातील जेऊरमध्ये निचांकी येथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात सध्या बर्फ वृष्टीला देखील सुरुवात झाली आहे. हे बर्फाळ वारे सध्या दक्षिण दिशेकडे वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी १० ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवण्यात आले आहे. याविषयीची अधिक माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासत कमाल आणि किमान तापमानात फारशी तफावत राहणार नाही. त्यानंतर तापमानात पुढील तीन दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
Amit Thackeray : अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच दाखल झाला गुन्हा..









