Mumbai CNG Gas : मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा हा ठप्प झाला असलायची माहिती आहे.
याचा परिणाम म्हणून सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. काल दुपारपासून पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅस (CNG Gas) पोहोचलेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील सीएनजी (CNG Petrol Pump) गॅस संपला आहे. त्यामुळे बऱ्याच पेट्रोल पंपाबाहेर लांबच्या लांब वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे सीएनजीच्या अभावामुळे सकाळपासून रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमी असल्याचे दिसत आहे.
वडाळ्यामध्ये असणाऱ्या आरसीएफ परिसरात असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक लवकरच पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे.मंगळवारी सकाळपर्यंत सीएनजीचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या विमानतळ परिसरातील सीएनजी पंप सुरू असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा –Vasai Student Death : Gen zना नव्या शिक्षकांच्या शिक्षा असह्य









