Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : संजय राऊतांची बाळासाहेबांनसाठीची तळमळ; गंभीर आजराला दुर्लक्ष करत संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

Sanjay Raut : संजय राऊतांची बाळासाहेबांनसाठीची तळमळ; गंभीर आजराला दुर्लक्ष करत संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

Sanjay Raut : ठाकरे पक्षाची धडाडती तोफ आणि उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : ठाकरे पक्षाची धडाडती तोफ आणि उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. ते एका गंभीर आजाराशी झुंज असल्या कारणामुळे डॉक्टरांनी सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता. याच पार्शवभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ३१ ऑक्टोबरला एक जाहीर पत्र जारी केले. दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी आल्याची माहिती होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याना आराम करणे गरजेचे होते आणि म्हणूनच कदाचित ते घरातून बाहेर पडले नव्हते. मात्र, सोमवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत कोणतीही बंधन न मानता घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यास पोहोचले.आज बाळासाहेब ठाकरेंचा १३ वा स्मृतीदिन असल्याने ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले.

शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसले. संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर नतमस्तक होतानाचे देखील सुरेख क्षण आहेत.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू देखील एकत्र आले होते. राज ठाकरे यांच्या शेजारीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानापन्न झाले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर एकत्र जमले होते.


बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, चंदू मामा असे इतर नेते देखील शिवाजी पार्कवर आले होते.


हे देखील वाचा – Glowing Skin Tips : तजेल चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी करून पहा हे उपाय

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या