Home / महाराष्ट्र / Sheikh Hasina Bagladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

Sheikh Hasina Bagladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

Sheikh Hasina Bagladesh : बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना एका आंदोलन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे....

By: Team Navakal
Sheikh Hasina Bagladesh
Social + WhatsApp CTA

Sheikh Hasina Bagladesh : बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना एका आंदोलन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या संधर्भात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने हसीना यांना हि फाशीची शिक्षा सुनावली. २०२४ बांगलादेशमध्ये एक हिंसक आंदोलन झाले होते. २०२४ च्या या आंदोलनानंतर शेख हसीना यांना नाईलाजाने देश सोडावा लागला होता. या आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता, त्यात आज न्यायालायने (Court) महत्पूर्ण निकाल दिला. या हिंसक आंदोलनामध्ये शेख हसीना यांच्यावर बरेच गंभीर आरोप करण्यात आले होते. हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर करण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले.

बांगलादेशमध्ये सरकारविरुद्ध उफाळलेल्या जणआक्रोशात करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरुन शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा खटला दाखल केला होता. २०२४ च्या जुलै महिन्यात सरकारविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. आणि याच आंदोलनादरम्यान १४०० नागरिकांची हत्या झाली, तर तब्ब्ल २५ हजार जखमी झाले होते, अशी माहिती मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी दिली होती. या खटल्यात हसीना यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना मात्र या खटलया दरम्यान अनुपस्थितीत होत्या. सध्या त्या भारतात वास्तव्य करत आहेत.

या हिंसक आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी कोर्टाने तब्ब्ल ५४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. देशभरातून मिळालेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या अतिरिक्त पुराव्यांचीही तपासणी यात करण्यात आली. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार शेख हसीना आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि हिंसाचार घडल्याचे न्यायालयाने निरीक्षणात नोंदवले आहे.


हे देखील वाचा – Thackeray Brothers : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या