Home / महाराष्ट्र / Aditya And Amit Thackeray : भावाच्या बचावार्थ आदित्य ठाकरेंची ती पोस्ट वायरल

Aditya And Amit Thackeray : भावाच्या बचावार्थ आदित्य ठाकरेंची ती पोस्ट वायरल

Aditya And Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

By: Team Navakal
Aditya And Amit Thackeray
Social + WhatsApp CTA

Aditya And Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि एकच चर्चा रंगली ते म्हणजे त्यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्याची. अमित ठाकरेंवर केलेला हा पहिलाच गुन्हा आहे. अमित ठाकरेंबरोबरच आणखीन ४० मनसे कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अमित ठाकरे यांच्यासाठी त्यांचे बंधू आणि आमदार तसेच उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे धावून आले आहेत. त्यांनी या प्रकरणी एक्सवर पोस्ट करत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. आमच्याच देवाचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ६ महिन्यापूर्वीच नेरुळमध्ये बसवला होता. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंची पाठराखण देखील केली असल्याचे दिसून आले.

एक्सवर पोस्ट करत त्यांनी याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर मग कोणाचा करायचा? पुढे ते म्हणतात ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! मागच्या काही महिन्यांपासून महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचे कापड काढून अनावरण केले, महाराजांचा सन्मान राखला, तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? अशी संतप्त प्रतिक्रिया देखील आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच निवडणूक आयोग सरकारची ही दादागिरी मोडून काढू, असा थेट इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.


हे देखील वाचा – Amit Thackeray : अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच दाखल झाला गुन्हा..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या