Home / News / Bihar: New Govt Thursday : बिहारात गुरुवारी नवे सरकार उद्या विधानसभा भंग होणार

Bihar: New Govt Thursday : बिहारात गुरुवारी नवे सरकार उद्या विधानसभा भंग होणार

Bihar: New Govt Thursday – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयू यांच्या एनडीएचे नवीन सरकार गुरुवारी अस्तित्वात येणार आहे. मावळते मुख्यमंत्री नितीश...

By: Team Navakal
Bihar: New Govt Thursday
Social + WhatsApp CTA

Bihar: New Govt Thursday – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयू यांच्या एनडीएचे नवीन सरकार गुरुवारी अस्तित्वात येणार आहे. मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांची भेट घेऊन विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव सोपवला. उद्या विद्यमान विधानसभा भंग केल्यानंतर गुरुवारी, २० नोव्हेंबरला नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

राज्यपाल भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, तसेच जदयू नेते विजय चौधरी उपस्थित होते. दरम्यान, आज होणारी जदयू विधिमंडळाची बैठक आता उद्या बोलावण्यात आली आहे. भाजपानेही विधिमंडळ गटनेता निवडीसाठी उद्याच आमदारांना पाटण्यातील पक्ष कार्यालयात बोलावले आहे.

दोन्ही पक्षांची विधिमंडळ बैठक झाल्यानंतर एनडीएच्या बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाईल. त्यानंतरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.

राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध गांधी मैदानात गुरुवारी नितीश कुमार हे १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी सांगितले की, नवीन मंत्रिमंडळात ३६ मंत्री असतील.

यामध्ये १६ भाजपाचे, १५ जदयूचे, ३ चिराग पासवानांच्या लोजपाचे, हम आणि रालोमोचा प्रत्येकी एक मंत्री असेल. सध्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी, आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, विद्यमान १७ व्या बिहार विधानसभेचा कार्यकाल २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधीच नव्या सरकारचा शपथविधी होणे आवश्यक आहे.


हे देखील वाचा –

 नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

 Thackeray Brothers : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..

Web Title:
संबंधित बातम्या