Maharashtra Election 2025 : राज्याच्या राजकारणात आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे राज्यातील निवडणूका. काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे बराच गदारोळ सुद्धा होता. निवडणूका घोषित झाल्यावर सुरवातीला महायुती एकत्र लढणार अशी घोषणा करण्यात आली. नंतर सातत्याने निर्णय बदलत देखील गेले. जिथे शक्य होईल तिथेच युती होईल असे बोलले गेले. आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आल्या. कोणीही कोणासोबतहि युती करत सुटलं आहे. भाजपाने तर काही ठिकाणी युतीसाठी इच्छुक असलेल्या मित्र पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तात्काळत ठेवल. सिंधुदुर्गात तर वेगळीच तरा चालू आहे. पण या सगळ्यामुळेच मतदार मात्र चांगलेच स्म्भ्रमीत झाले आहे. बड्या राजकीय पक्षांचे असे विचार बुद्धी सोडून वागणे त्यांच्याच मतांची संख्या कमी करणारे ठरेल का?
निवडणूकीच्या निमित्ताने कोकणात मात्र वेगळंच आणि आकलनेच्या पलीकडचे चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहायल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या गतीला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष हे अत्यंत विरोधी पक्ष शहर विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आले असलयाचे चित्र आहे. तर रायगड जिल्ह्यात कर्जत खोपोली नगरपालिकांच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माविआतील शिवसेना ठाकरे गट आणि शेकापशी हातमिळवणी केल्याचे दिसत आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या नावाखाली हे विरोधी पक्ष एकत्र आले असल्याच्या चर्चा आहेत.
हि युती आता किती फायद्याची ठरणार आहे हा येणारा काळ ठरवेल. स्थानिक पातळीवर स्वतःच्या फायद्यानुसार युती करून मतदारांमध्ये संभ्रम तर निर्माण केला पण राजकीय पातळीवर मात्र हम साथ साथ हे ची नाटक का चालू आहेत? अनेक नगरपालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्येच मोठी चढाओढ पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयीस्कर युती आघाडी करण्याचा प्लॅन सर्वच राजकीय पक्षांनी अमलात आणलेला दिसत आहे.
भाजपला रोखण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसनी या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर एकत्र आले आहेत. कणकवली शहर विकास आघाडी असे नाव देखील या आघाडीला देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील या भावांची जोडी या निवडणुकीमुळे तुटणार कि अधिक बळकट होणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
हि निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनणार आहे. परंतु स्थानिक पातळीवर होणारे बदल या निवडणुकीवर किती परिमाण करतील हे पाहणे सुद्धा तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – Best Scooters : तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या भारतातील 5 सर्वात स्वस्त स्कूटर्स; पूर्ण लिस्ट पाहा









