Mumbai Local Disruption : मध्य रेल्वेवरील विक्रोळी-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळाला आज तडा गेला. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल विस्कळी झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्वरित रेल्वे रूळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लोकल सेवा आता पूर्वपदावर आली आहे.
विक्रोळी – कांजूरमार्गदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मंगळआज वारी सकाळी ७.३२ च्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. परिणामी, प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसला. या घटनेमुळे लोकल एका मागे एक उभ्या राहिल्या होत्या.
कल्याण, ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवासी प्रचंड त्रस्त झाले होते. या घटनेमुळे सगळ्यांनाच इच्छित स्थळी वेळेत पोहचण्यास विलंब झाला. धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद झाल्याने, लोकल जलद मार्गावर वळवण्यात आली होती. यामुळे काही लोकल धीम्या स्थानकात थांबल्या नाहीत.
रेल्वे रूळाच्या दुरुस्तीचे काम सकाळी ७.५८ वाजता पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. मात्र धीम्या मार्गावरून कल्याण – सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या घटनेमुळे प्रवाशांना बराच काळ लोकल सेवा उपलब्ध नव्हती. विक्रोळी-कांजूरमार्गदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ८ वाजल्यापासून पासून लोकलचा वेग प्रतितास ३० किमी एवढाच ठेवण्यात आला. मात्र वेगमर्यादा लागू झाल्याने, लोकलची गती मंदावली होती. त्यामुळे नेहमीपेक्षा लोकल बराच वेळ उशिराने धावत होती.
हे देखील वाचा – Thane Crime : अंबरनाथमधील धक्कादायक घटना ! ८-९ जणांचा तलवार कोयत्यांनी तरुणावर जीवघेणा हल्ला..









