Home / महाराष्ट्र / Maharashtra Weather Update : पुण्यात तापमानात वेगाने घट? पुढच्या काही दिवसात थंडीची तीव्रता अधिक वाढणार

Maharashtra Weather Update : पुण्यात तापमानात वेगाने घट? पुढच्या काही दिवसात थंडीची तीव्रता अधिक वाढणार

Maharashtra Weather Update : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात (Weather Update) प्रचंड घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे...

By: Team Navakal
Maharashtra Weather Update
Social + WhatsApp CTA

Maharashtra Weather Update : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात (Weather Update) प्रचंड घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात (cold wave) कमी-अधिक प्रमाणात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा आधीच गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंश इतकं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून १० अंश इतकं तापमान होतं, मात्र काल पुण्यात ९.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पुणे शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. तर दिवसा सूर्यप्रकाश जरी असला तरी देखील हवेमध्ये गारवा तसाच राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात बोचरी थंडी जाणवायला देखील सुरवात झाली आहे. पुण्यातही मागच्या दोन-तीन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. मात्र तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

नाशिक जिल्ह्यात देखील यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा घसरला आहे. मागच्या २४ तासात २ या अशांनी पारा खाली आल्याचे समोर आले आहे. या मोसमातील ६.९ अंश सेल्सिअस एवढ्या निचाकी तापमानाची नोंद देखील करण्यात आली आहे.


हे देखील वाचा – Parth Pawar Pune Land Scam : पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमाणियांची आक्रमक भूमिका

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या