Home / महाराष्ट्र / Maharashtra Cabinet Meeting मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार...

By: Team Navakal
Maharashtra Cabinet Meeting
Social + WhatsApp CTA

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली . या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे असे सहा निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्वाचे ६ निर्णय पुढील प्रमाणे : (Maharashtra Cabinet Meeting)

१. नगर विकास विभाग
राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार आहे. शिवाय सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण देखील निश्चित केले आहे.

२. गृहनिर्माण विभाग

बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार आहे.

३. मदत व पुनर्वसन विभाग

भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकऱणांचा जलदगतीने निपटारा होणार आहे.

४. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता ३३९ पदांची निर्मिती होणार. शिक्षकांची २३२ आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता

५. महिला व बाल विकास विभाग

महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता मिळणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळण्यात येणार.

६. विधि व न्याय विभाग
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा कऱण्यास मान्यता मिळणार.


हे देखील वाचा –

Maharashtra Weather Update : पुण्यात तापमानात वेगाने घट? पुढच्या काही दिवसात थंडीची तीव्रता अधिक वाढणार

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या