Home / राजकीय / Nawab Malik : मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा

Nawab Malik : मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा

Nawab Malik : माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar–led NCP) नेते नवाब मलिक यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील...

By: Team Navakal
Nawab Malik
Social + WhatsApp CTA

Nawab Malik : माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar–led NCP) नेते नवाब मलिक यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने आज आरोप निश्चित केले. मलिक यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावल्याने आता या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील सुनावणी (Hearing) १९ डिसेंबरला होणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण (Dawood Ibrahim’s sister,) हसीना पारकर यांच्याशी संगनमत करून कुर्ला येथील सुमारे तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप केला आहे. दाऊद टोळीशी संबंधित लोकांशी संगनमत करून ही जमीन लाटण्यात आली आणि सुमारे १६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला, असा ईडीचा दावा आहे. दरम्यान, याच प्रकरणात मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाली होती. सध्या ते जामिनावर आहेत.

याच प्रकरणात आज येथील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर (Special PMLA Court) मलिक आणि त्यांच्या कंपनीने दोषमुक्त करण्याची याचिका दाखल केली होती. पण न्यायाधीश सत्यनारायण नावंदर (Judge Satyanarayan Navandar) यांनी ती फेटाळून लावली. न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील (PMLA Act)विविध कलमांखाली आरोप निश्चित केले. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. लवकरात लवकर खटला निकाली काढण्यासाठी रोज सुनावणी घेण्याचे संकेतही न्यायालयाने दिले.


हे देखील वाचा –

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

 बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..

नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली

Web Title:
संबंधित बातम्या