Home / Uncategorized / Umar Khalid : सहआरोपीच्या जामिनाचा संदर्भ देण्याला सुप्रीम कोर्टात आक्षेप ; उमर खालीद जामिनावर सुनावणी

Umar Khalid : सहआरोपीच्या जामिनाचा संदर्भ देण्याला सुप्रीम कोर्टात आक्षेप ; उमर खालीद जामिनावर सुनावणी

Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणातील (Delhi riots case)उमर खालीदसह इतर सहा आरोपींना जामीन देण्यास दिल्ली पोलिसांनी आक्षेप (Objection) घेतला...

By: Team Navakal
Umar Khalid
Social + WhatsApp CTA

Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणातील (Delhi riots case)उमर खालीदसह इतर सहा आरोपींना जामीन देण्यास दिल्ली पोलिसांनी आक्षेप (Objection) घेतला असून सहआरोपींच्या जामिनाचा संदर्भ देता येणार नाही, असे आजच्या सुनावणीत म्हटले आहे.

दिल्लीतील दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालीद, शर्जिल इमान (Sharjeel Imam), गुलफिसा फातिमा (Gulfisha Fatima), मिरन हैदर (Meeran Haider) या आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती अरविंद कुमार (Justices Aravind Kumar)व न्यायमूर्ती एनव्ही अंजेरिया यांच्या पीठासमोर झाली.

जामीन अर्जाविरोधात अतिरिक्त सॉलिस्टर जनरल एस. व्ही. राजू (General S.V. Raju)यांनी युक्तीवाद केला की, या प्रकरणातील जामीन मिळालेल्या तीन सहआरोपींचा संदर्भ या सहा जणांच्या जामीन अर्जासाठी देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने या आधी दिलेल्या निकालात हे स्पष्ट केले आहे. यातील उमरचा जामीन या आधीही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनीही काही ठोस कारण असल्याशिवाय वारंवार जामीनासाठी अर्ज करु नये.

त्यासोबतच सॉलिस्टर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला की, आरोपी शर्जिल इमाम याचे सर्व मुस्लिमांनी एकत्र यायला पाहिजे हे वाक्य गंभीरपणे घेतले पाहिजे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.


हे देखील वाचा –

मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या