Oppo Find X9 Series : ओप्पो (Oppo) कंपनीने अखेर आपला बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज Find X9 भारतात लाँच केली आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या सीरिजमध्ये Oppo Find X9 आणि X9 Pro चा समावेश आहे. या स्मार्टफोन सीरिजची किंमत-फीचर्स जाणून घेऊया.
Oppo Find X9 आणि X9 Pro ची किंमत
Oppo Find X9:
- 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 74,999 रुपये आहे.
- 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 84,999 रुपये आहे.
- हा फोन स्पेस ब्लॅक आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo Find X9 Pro:
या हाय-एंड मॉडेलची किंमत 1,09,999 रुपये असून ते सिल्क व्हाईट आणि टायटॅनियम चारकोल कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
या दोन्ही उपकरणांसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली असून, त्यांची विक्री 21 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.
Oppo Find X9 ची वैशिष्ट्ये
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.59 इंचाचा 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले आहे. यात 3,600 निट्सची पीक ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळतो.
प्रोसेसर: Find X9 मध्ये डायमेन्सिटी 9500 प्रोसेसर आणि आर्म माली G1 अल्ट्रा MC12 GPU आहे.
स्टोरेज: फोन 12 जीबी किंवा 16 जीबी LPDDR5X रॅम आणि 256 जीबी किंवा 512 जीबी UFS 4.1 स्टोरेजसह येतो.
बॅटरी: यात 7,025 एमएएचची मोठी बॅटरी असून, 80 वॅटचे सुपरवूओसीसी फास्ट चार्जिंग आणि 50 वॅटचे वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा: मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा सोनी LYT808 प्रायमरी कॅमेरा (OIS सह), 50 मेगापिक्सलचा सॅमसंग JN5 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 50 मेगापिक्सलचा सोनी LYT600 पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मल्टी स्पेक्ट्रल लेन्सचा सेटअप आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा सोनी IMX615 शूटर देण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: दोन्ही फोनमध्ये ॲन्ड्रॉइड 16 आधारित ColorOS 16 देण्यात आले आहे. यात 5 वर्षांच्या ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांच्या सुरक्षा पॅचेसचा सपोर्ट आहे.
Oppo Find X9 Pro ची उत्कृष्ट वैशिष्ट्ये
डिस्प्ले: यात 6.78 इंचाचा LTPO एमोलेड डिस्प्ले आहे. सुरक्षिततेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन आहे.
मेमरी: Pro व्हेरियंट 16 जीबी LPDDR5X रॅम आणि 512 जीबी UFS 4.1 स्टोरेजच्या सिंगल मॉडेलमध्ये येतो.
बॅटरी: यात 7,500 एमएएचची आणखी मोठी बॅटरी आहे.
कॅमेरा: यात 50 मेगापिक्सलचा सोनी LYT828 प्रायमरी कॅमेरा (OIS सह), 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 200 मेगापिक्सलचा सॅमसंग HP5 3X पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मल्टी स्पेक्ट्रल लेन्सचा सेटअप आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा सॅमसंग JN5 सेन्सर देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Cloudflare नक्की काय आहे? यातील समस्येमुळे जगभरातील ऑनलाइन सेवा का बंद पडल्या? वाचा









