Eknath Shinde : गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात विविध बदल होताना दिसत आहेत. पण हे बदल चांगले कि वाईट हा येणार काळच ठरवेल. आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर महायुतीतील कुरघोडी तसेच माविआतील अंतर्गत नाराजी कोणालाच लपलेली नाही. अचानक होणारे पक्ष प्रवेश आणि निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार यामुळे सगळीच गुंतागुंत अधिक वाढली आहे.
त्यात आता भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घाऊक पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची वाढती कोंडी कोणापासूनच लपली नाही. पण हे असच चालू राहील तर भविष्यातही हि कोंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून हिसकावून आणलेले नेते आणि पदाधिकारी जे आता पर्यंत शिंदेच्या शिवसेनेत होते आता या पधाधिकार्यांना तसेच नेत्यांना भाजपकडून प्रवेश देण्यात येत आहे. यात नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीतील अश्या अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ह्या निवडणुकीसाठी भाजपचा हा कोणता नवीन डाव आहे का असा सवाल देखील आता निर्माण होत आहे. असेच जर सुरु राहिले तर शिंदेच्या हातात काहीच उरणार नाही. या सततच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे मंत्री व्यथित झाले होते. त्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार देखील टाकला होते. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ह्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. तर काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून पक्षप्रवेशाच्या घटनांवर मोठी नाराजी व्यक्त केली होती.
कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिल्याचं सांगत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली नाराजी व्यक्त देखील केली होती. पण या फोडाफोडीच्या राजकारणाला तुम्हीच सुरुवात केली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी या गोष्टीला समर्थन दिले आहे. आणि विशेष म्हणजे हा सगळा प्रकार शिंदें समोर घडला. शिंदेंचे मौन शिवसेनेची कोंडी वाढवते आहे का असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे. या आधी देखील असे अनेक पक्ष प्रवेश झाले असतील पण शिंदेंच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेश हे शिवसेना नाहीशी होण्याचे मोठे कारण बनू शकते. त्यामुळे येत्या आगामी काळात शिंदे यावर कोणते महत्वपूर्ण निर्णय घेणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –









