Home / देश-विदेश / Aishwarya Rai : धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं ते वक्तव्य वायरल, वाचा काय म्हणाली ऐश्वर्या राय

Aishwarya Rai : धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं ते वक्तव्य वायरल, वाचा काय म्हणाली ऐश्वर्या राय

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चन ही कायमच तिच्या बोल्ड आणि सुंदरतेमुळे चर्चेत असते. तिला फक्त एक नजर पाहण्यासाठी तिच्या...

By: Team Navakal
Aishwarya Rai
Social + WhatsApp CTA

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चन ही कायमच तिच्या बोल्ड आणि सुंदरतेमुळे चर्चेत असते. तिला फक्त एक नजर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची रांग लागलेली असते. आज, अभिनेत्री आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिग्गज क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्यासोबत आली होती. ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच हलक्या रंगाच्या मस्टर्ड सूटमध्ये आकर्षक दिसत होती. पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करतानाचा तिचा एक व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच वायरल होत आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी तिला आशीर्वाद दिले. यासोबतच, प्रेम आणि धर्माबद्दल ऐश्वर्याचे भावनिक भाषण देखील व्हायरल झाले आहे, ज्याने लोकांची मने जिंकली आहेत.

आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रेक्षकांना संबोधित करताना ऐश्वर्या राय बच्चन म्हणते, “श्री सत्य साई बाबांच्या पवित्र आगमनाची १०० वर्षे साजरी करत असताना, आपण सर्वजण त्यांच्या दैवी संदेशाला पुन्हा स्मरण करूयात. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा. पुढे ती म्हणते फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात. फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म. फक्त एकच भाषा आहे, आणि ती आहे हृदयाची भाषा. आणि फक्त एकच देव आहे आणि तो सर्वव्यापी आहे. पंतप्रधान मोदींचे आभार मानताना ऐश्वर्या पुढे म्हणाली, “आज येथे आमच्यासोबत असल्याबद्दल आणि या खास प्रसंगाचा सन्मान केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानते. आज आम्हाला मोहित करण्यासाठी नेहमीप्रमाणेच प्रभावी आणि प्रेरणादायी शब्द ऐकण्यास मी उत्सुक आहे.”

ऐश्वर्या पुढे म्हणते, “तुमची उपस्थिती या शताब्दी सोहळ्यात पावित्र्य आणि प्रेरणा भरते आणि स्वामींच्या संदेशाची आठवण करून देते की खरे नेतृत्व म्हणजे सेवा आणि मानवाची सेवा हीच देवाची सेवा आहे. ऐश्वर्या राय बच्चन ही सत्य साई बाल विकास कार्यक्रमाची विद्यार्थिनी होती. तिने वेळोवेळी बाबांशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले आहे आणि ती लहानपणापासूनच बाबांची दीर्घकाळ भक्त आहे.

नेमके कोण होते सत्य साई बाबा?

सत्यनारायण राजू यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी पुट्टपर्थी इथे झाला होता. त्यांनी आपलं जीवन प्रेम, निस्वार्थ सेवा आणि सलोखा पसरवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या शिकवणी आणि मानवतावादी कार्यामुळं असंख्य लोकांच्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडला. २४ एप्रिल २०११ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या