Parineeti Chopra : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी एका बाळाचा जन्म दिला. आजच या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या नवजात बाळाचे नाव जाहीर केले आहे. नीर असे जाहीर केले.
इंस्टाग्रामवर तिने यासंदर्भातील एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यांच्या या फोटोला त्यांनी एक गोड कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोमध्ये परिणीती आणि राघव त्यांच्या बाळासोबत पोज देताना दिसत आहेत. पण या जोडप्याने त्यांच्या बाळाचा चेहरा उघड केला नाही. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या बाळाचे नाव नीर ठेवल्याचे जाहिर केले आहे. यासोबतच त्यांनी नीर या नावाचा अर्थ शुद्ध, दिव्य आणि अमर्यादित असल्याचे देखील सांगितले.
पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते, “जलस्य रूपम, प्रेमस्य स्वरूपम – तत्र एवा नीर. जीवनाच्या एका अनंत थेंबात आमच्या हृदयाला शांती मिळाली असं सुंदर कॅप्शन त्यांनी दिल होत. त्यांच्या या पोस्ट खाली अनेक सेलिब्रिटीनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा –
Aishwarya Rai : धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं ते वक्तव्य वायरल, वाचा काय म्हणाली ऐश्वर्या राय









