Home / arthmitra / PM Kisan 21st Installment : PM किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता जारी! तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा

PM Kisan 21st Installment : PM किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता जारी! तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा

PM Kisan 21st Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर...

By: Team Navakal
PM Kisan 21st Installment
Social + WhatsApp CTA

PM Kisan 21st Installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता जारी केला आहे. या अंतर्गत 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये18 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला आहे.

तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला की नाही, कसे तपासावे?

अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. जर तुमचा हप्ता प्रलंबित असेल, तर तुम्हाला बँकेतजाण्याची किंवा इतरांना विचारण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून मिनिटांत तुमच्या मोबाईल फोनवरून हप्त्याची स्थिती तपासू शकता. यासाठी खालील सोप्या पद्धतीचे अनुसरण करा:

अधिकृत वेबसाइटवर जा: तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर उघडा आणि पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच pmkisan.gov.in वर जा.

‘Know Your Status’ पर्याय निवडा: होमपेजवर तुम्हाला ‘Know Your Status’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

आधार क्रमांक प्रविष्ट करा: नवीन पेज उघडल्यावर, तेथे तुमचा आधार (Aadhaar) क्रमांक प्रविष्ट करा.

माहिती सबमिट करा: कॅप्चा भरून ‘Get Data’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेटस पहा: तुमच्या स्क्रीनवर हप्ता पाठवल्याची तारीख, बँक खात्यातील हस्तांतरणाची स्थिती, अर्जामधील त्रुटीआणि ई-केवायसी (E-KYC) पूर्ण झाल्याची माहिती दिसेल.

जर तुमचा मोबाईल क्रमांक पोर्टलवर अपडेट नसेल किंवा बँक पडताळणी अयशस्वी झाली असेल, तर तुम्हाला हप्ता जमा झाल्याचा संदेश मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या