Home / क्रीडा / Harbhajan Singh : आधी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार; आता थेट पाकच्या खेळाडूशी हस्तांदोलन; हरभजन सिंहच्या दुटप्पीपणावर टीका

Harbhajan Singh : आधी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार; आता थेट पाकच्या खेळाडूशी हस्तांदोलन; हरभजन सिंहच्या दुटप्पीपणावर टीका

Harbhajan Singh Shahnawaz Dahani Handshake : गेल्याकाही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. याचे परिणाम खेळाच्या मैदानावर देखील पाहायला...

By: Team Navakal
Harbhajan Singh
Social + WhatsApp CTA

Harbhajan Singh Shahnawaz Dahani Handshake : गेल्याकाही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. याचे परिणाम खेळाच्या मैदानावर देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्याकाही भारत-पाक सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंना हँडशेक करणे टाळले होते.

मात्र, नुकतेच, माजी भारतीय ऑफ-स्पिनर हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहानी यांनी अबुधाबी टी10 लीगमध्ये हस्तांदोलन केले.

झाएद क्रिकेट स्टेडियमवर हरभजनच्या ॲस्पिन स्टॅलियन्स संघाचा नॉर्दर्न वॉरियर्सकडून चार धावांनी पराभव पत्करावा लागला, त्यानंतर लगेचच हा क्षण कॅमेरात कैद झाला. हरभजन सिंहने पाक खेळाडूशी केलेले हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरला आहे.

हस्तांदोलनाचे महत्त्व का आहे?

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी मैदानावर हस्तांदोलन करणे टाळले आहे. त्यामुळे भारतीय पुरुष, महिला आणि युवा संघही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मॅच संपल्यानंतरची ही औपचारिकता टाळत आहेत. हरभजनने स्वतः राष्ट्रीय भावनांचा आदर करत एका दिग्गज सामन्यातून पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.

या पार्श्वभूमीवर दहानीने 10 धावा देऊन 2 बळी घेत सामनावीर पुरस्कार मिळवल्यानंतर हरभजनकडे हस्तांदोलनासाठी पुढाकार घेतला आणि ॲस्पिन स्टॅलियन्सच्या कर्णधाराने हसतमुखाने त्याला प्रतिसाद दिला.

सोशल मीडियावर टीका

हरभजन सिंहने पूर्वी पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे “क्रिकेट आणि व्यापार दोन्ही बंद केले पाहिजेत” असे मत व्यक्त केले होते. तसेच, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय देखील भारतीय खेळाडूंनी घेतला होता. मात्र, आता हरभजनने अचानक पाक खेळाडूशी हस्तांदोलन केल्याने याची चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा – MG Windsor EV : ‘या’ इलेक्ट्रिक कारने सर्वांनाच लावले वेड, 50 हजार लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत-वैशिष्ट्ये जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या