Home / देश-विदेश / Bihar CM Nitish Kumar : बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा दहाव्यांदा शपथविधी; वाचा कोण-कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ

Bihar CM Nitish Kumar : बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा दहाव्यांदा शपथविधी; वाचा कोण-कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ

Bihar CM Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळाल. आणि २४३ जागांपैकी २०२ जागांवर त्यांनी...

By: Team Navakal
Bihar CM Nitish Kumar
Social + WhatsApp CTA

Bihar CM Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळाल. आणि २४३ जागांपैकी २०२ जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने बिहार निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत बिहारमध्ये मोठा भाऊ बनला. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर (chief minister) कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता तर होतीच. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार (Nitish kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आज शपथ घेतली. बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी आज दहाव्यांदा शपथ घेतली. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर आज हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळ येऊन नितीश कुमार यांचे अभिनंदन देखील केले. तर, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, इतरही मंत्र्यांचा शपधविधी सोहळा आज संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले.

बिहारमधील भाजपाचे मंत्री पुढील प्रमाणे-
१. सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री
२. विजय कुमार सिना – उपमुख्यमंत्री
३. मंगल पांडे – मंत्री
४. दिलीप कुमार जयस्वाल – मंत्री
५. नितीन नबिन – मंत्री
६. राम कृपाल यादव – मंत्री
७. संजय सिंह टायगर – मंत्री
८. अरुण शंकर प्रसाद – मंत्री
९. सुरेंद्र मेहता – मंत्री
१०. नारायण प्रसाद – मंत्री
११. रामा निशाद – मंत्री
१२. लखेंद्र कुमार रौशन – मंत्री
१३. श्रेयाशी सिंह – मंत्री
१४. प्रमोद कुमार – मंत्री

बिहारमधील जदयूचे मंत्री पुढील प्रमाणे-
१. विजय कुमार चौधरी – मंत्री
२. विजेंद्र कुमार यादव – मंत्री
३. श्रावण कुमार – मंत्री
४. लेशी सिंह – मंत्री
५. अशोक चौधरी – मंत्री
६. मदन साहिनी – मंत्री
७. सुनील कुमार – मंत्री
८. मोहम्मद झमा खान – मंत्री

बिहार मंत्रीमंडळातील इतर पक्षांच्या मंत्री पदाची यादी पुढील प्रमाणे-
१. संतोश कुमार सुमन – हिंदुस्थानी आवाम मोर्चा
२. संजय कुमार – लोकजनशक्ती पार्टी (रामविलास गट)
३. संजय कुमार सिंह – लोकजनशक्ती पार्टी (रामविलास गट)
४. दीपक प्रकाश – राष्ट्रीय लोक मोर्चा

हे देखील वाचा –

Ahilyanagar News : बिबट्यांच्या दहशतीमुळे शाळेच्या वेळेत बदल

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या