IRCTC New Rules : भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता इथून पुढे प्रवाशांना आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे अनिवार्य असणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, IRCTC च्या वेबसाइट आणि मोबाईल ऍपद्वारे सकाळी ८ ते १० या वेळेत तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक केलेले असणे अत्यतं आवश्यक आहे.
हा नियम लागू करण्याचा मुख्य उद्देश तिकीट बुकिंगमध्ये होणारी फसवणूक थांबवणे हा आहे, आणि त्याचबरोबर खऱ्या प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळण्यास प्राधान्य मिळेल. सकाळी ८ ते १० ही वेळ तिकीट बुकिंगसाठी सर्वात जास्त व्यस्त मानली जाते. या वेळेत एजंट्स किंवा काही लोक मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करून त्यांची जास्त दरात विक्री करतात, ज्यामुळे तिकीट आहे त्या किमतीपेक्षा अधिक किमतीत विकले जाते. आणि यासगळ्याचा त्रास सामान्य प्रवाशांना त्रास होतो.
यामध्ये मुख्य काय बदलले?
सकाळी ८ ते १० या वेळेत ज्या irctc अकाउंट्सचे आधार प्रमाणीकरण झाले आहे, फक्त तेच प्रवासी तिकीट बुक करू शकतील.
प्रमाणीकरण नसेल तरः आधार लिंक न केलेले प्रवासी
आणि जर प्रमाणीकरण नसेल तरः आधार लिंक न केलेले प्रवासी सकाळी १० नंतर तिकीट बुक करू शकतात. तत्काळ तिकीट बुकिंगसाठी यापूर्वीच आधार प्रमाणीकरण हे अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रवाशांनी IRCTC अकाउंटमध्ये ‘My Profile’ या स्लगमध्ये जा त्यात ‘Authenticate User’ या पर्यायाचा वापर करून ओटीपी (OTP) द्वारे आधार लिंक करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. हा डिजिटल आणि पारदर्शक उपक्रम रेल्वे तिकीट प्रणालीची विश्वासार्हता अधिक वाढवेल, असा विश्वास देखील रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा –









