Home / मनोरंजन / Shiv Thakare : आगीच्या दुर्घटनेनंतर शिव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Thakare : आगीच्या दुर्घटनेनंतर शिव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Thakare : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेच्या मुंबईतल्या राहत्या घरी मंगळवारी आग लागली. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे...

By: Team Navakal
Shiv Thakare
Social + WhatsApp CTA

Shiv Thakare : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेच्या मुंबईतल्या राहत्या घरी मंगळवारी आग लागली. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. यानंतर रात्री त्यानं सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर करत अपडेट दिली होती. आणि आता त्यानंतर त्याने ही आगीची घटना झाली तेव्हाची परिस्थिती सांगितली आहे.

शिवच्या मुंबईच्या राहत्या घरातील हॉलमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती या संधर्भात त्याने अनेक खुलासे देखील केले आहेत. याबद्दल त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. तो म्हणतो “आधी १० सेकंद मला काहीच समजले नाही की नक्की काय होतंय. मग लगेच मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन केला, अग्निशमन दलाला कळवलं आणि ते पाच मिनिटांत तिथे पोहोचलेही.”

घडलेल्या प्रसंगाबद्दल शिव पुढे सांगतो, “ही चांगली सोसायटी आहे, पण आग लागली तेव्हा ना सायरन वाजला ना हि इतर कुटला अलार्म वाजला. त्यांचं म्हणणं होतं की काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हि आग लागली. सुदैवाने आग फक्त हॉलपर्यंतच मर्यादित राहिली होती. जर आग बेडरूमपर्यंत पोहोचली असती तर कदाचित मी तिथून बाहेरही निघू शकलो नसतो. माझी आजी देखील बहुतेक वेळा हॉलमध्येच बसते, पण देवाची कृपा की ती यावेळी गावी होती.

पुढे तो सांगतो, सोसायटीतील विजेच्या समस्यांबद्दल त्याने बऱ्याचदा मॅनेजमेंटकडे तक्रार केली होती, पण यावर कोणीच काही उपाय केला नाही. याबद्दल शिव पुढे म्हणाला, “सोसायटी मॅनेजमेंट बिल्डरला दोष देत आहे आणि बिल्डर हात वर करून बसला आहे. या घटनेनंतर सोसायटीतील सगळे सीनियर लोकही एकत्र आले आणि तेही म्हणत होते की आम्ही कित्येक दिवसांपासून यासंदर्भात तक्रारी करत आहोत, कोणाच्या जीवाला धोका झाल्यावरच ऐकणार आहात का? आज आग माझ्या फ्लॅटपर्यंतच मर्यादित होती, पण जर संपूर्ण इमारतीत पसरली असती तर काय केलं असत? त्यांचं म्हणणं होतं की फायर अलार्म मोठी आग लागल्यावरच वाजतो. मग मी विचारलं, ‘यापेक्षा अजून किती मोठी आग लागायला हवी होती? या आगीत कोणी जळून गेलं असतं तर काय केलं असत? सगळे एकमेकांवर खापर फोडण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, अभिनेत्याच्या घराचं मात्र यात प्रचंड नुकसान झालं आहे.


हे देखील वाचा –Gondia Crime : नोकरीच्या आड बाळ येत होत म्हणून बाळाला संपण्याचा रचला कट; आईनेच घेतला २० दिवसाच्या बाळाचा जीव

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या