Robert Vadra- काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra)यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांमध्ये आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. हा खटला ब्रिटिश शस्त्रास्त्र व्यावसायिक संजय भंडारी यांच्यासमवेतच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे.
दिल्लीतल्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या मते, वाड्रा आणि भंडारी यांच्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये परदेशी मालमत्ता आणि परदेशात निधी हस्तांतराचा समावेश आहे. याची चौकशी केली जात आहे. जुलैमध्ये रॉबर्ट वाड्रा यांना पीएमएलएअंतर्गत जबाब नोंदवण्यात आला होता. या नवीन आरोपपत्रात वाड्रा यांचे नाव नववे आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –









