Home / लेख / Tesla Model Y किती सुरक्षित? क्रॅश टेस्टमधून समोर आली माहिती

Tesla Model Y किती सुरक्षित? क्रॅश टेस्टमधून समोर आली माहिती

Tesla Model Y Crash Test : भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इलेक्‍ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाचे Model Y अनेक ग्राहक खरेदी करत...

By: Team Navakal
Tesla Model Y Crash Test
Social + WhatsApp CTA

Tesla Model Y Crash Test : भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इलेक्‍ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाचे Model Y अनेक ग्राहक खरेदी करत आहेत. नुकतीच या गाडीची सुरक्षा तपासण्यासाठी नुकतीच युरोपातील एका संस्थेकडून क्रॅश चाचणी करण्यात आली.

या चाचणीत या इलेक्‍ट्रिक एसयूव्हीला संपूर्ण 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. गाडीच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या एडिशनसाठी हे रेटिंग लागू मानले जाईल.

सुरक्षेचा तपशील आणि मिळालेले गुण युरोपातील संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, Tesla Model Y ला वेगवेगळ्या स्तरांवर खालीलप्रमाणे गुण मिळाले:

  • प्रौढांची सुरक्षा: 91 टक्के गुण.
  • लहान मुलांची सुरक्षा: 93 टक्के गुण.
  • पादचाऱ्यांची सुरक्षा: 86 टक्के गुण.
  • सुरक्षा सहाय्यता प्रणाली: 92 टक्के गुण.

प्रौढांसाठी सुरक्षितता: प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या फ्रंटल इम्पॅक्ट चाचणीत 16 पैकी 14.2 गुण, लॅटरल इम्पॅक्ट मध्ये 16 पैकी 15.3 गुण आणि रिअर इम्पॅक्ट मध्ये 4 पैकी संपूर्ण 4 गुण मिळाले आहेत.

लहान मुलांसाठी सुरक्षितता: लहान मुलांसाठी ही एसयूव्ही अत्यंत सुरक्षित सिद्ध झाली आहे. मुलांसाठी केलेल्या फ्रंटल इम्पॅक्टमध्ये संपूर्ण 16 गुण आणि लॅटरल इम्पॅक्ट टेस्टमध्ये संपूर्ण 8 गुण मिळाले आहेत.

वैशिष्ट्ये आणि रेंज

Tesla Model Y मध्ये 15.4 इंच टचस्क्रीन (Touchscreen), गरम आणि हवेशीर सीट्स, सभोवतालचे लाइट्स, रिअर व्हिल ड्राइव्ह, नऊ स्पीकर, एईबी, टिंटेड ग्लास रूफ यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ही कार कमी आणि जास्त रेंजच्या बॅटरीच्या पर्यायांसह उपलब्ध केली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 500 किलोमीटर ते 622 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

किंमत

टेस्लाने ही कार जुलै महिन्यातच भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. या कारची भारतातील एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आहे. याच्या सर्वात महागड्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 67.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

हे देखील वाचा – काँग्रेस कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; आमदारांची थेट दिल्लीवारी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या