Home / महाराष्ट्र / Mahayuti Politics : महारष्ट्रातील निवडणूका आणि महायुतीमधील राजकारण

Mahayuti Politics : महारष्ट्रातील निवडणूका आणि महायुतीमधील राजकारण

Mahayuti Politics : राजकीय वर्तुळात सतत रंगणार वाद काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि महायुतीतील मतभेत कोणापासून लपून राहिलेले...

By: Team Navakal
Mahayuti Politics
Social + WhatsApp CTA

Mahayuti Politics : राजकीय वर्तुळात सतत रंगणार वाद काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि महायुतीतील मतभेत कोणापासून लपून राहिलेले नाही आहेत. मागे अमित शहांनी केलेल भाषण देखील चर्चेचा विषय बनले होते. त्यांनी वापरलेला कुबड्या हा शब्द शिंदेंच्या चांगलाच जीवहारी लागलेला दिसला. पण अमित शंहाची हि राजकीय खेळी काही नवीन नाही. किंवा असेही नाही कित्यांनी भारताच्या इतर राज्यात कुबड्या वापरल्या नाहीत. त्यांनी इतर राज्यांमध्ये कुबड्या वारल्याही आणि वेळ आली कि त्या स्वतःपासून दूर देखील केल्या. त्यांच हे बारकी राजकारण सहज बाहेर येईल अश्यातला देखील विषय नाही. महाराष्ट्रात सुरवातीला भाजपचं अस्तित्व न्हवत काँग्रेसच्या सत्तेला कंटाळून सामान्य जनतेने भाजपला मतदान केले आणि तेव्हा पासून भाजपने राज्याचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून महाराष्ट्रात भाजपच्या प्रगतीला वेग मिळाला.

महाराष्ट्रात निवडणूका जाहीर झाल्या आणि राज्याच्या राजकारणाला वेग आला. महायुतीची निवडणूक जाहीर व्हायच्या आधीची भूमिका आणि आत निवडणूक जाहीर झाल्यानंतरची भूमिका यात बरीच तफावत जाणवते. आता महाराष्ट्रात निमित्त जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे असले तरी भाजप केवळ तेवढ्यापुरता विचार मर्यादित न ठेवता इतर राज्यात त्यांना कोणकोणती उपायोजना करता येईल ह्याचा देखील विचार करतात. काही दिवसांपूर्वी शहांनी केलेल्या कुबड्यांच्या वक्तव्यामुळे सहाजिकच महायुतीत तडा गेल्याचे पाहायला मिळाले.

पुढच्या नाट्यमय घडामोडींना देखील इथूनच सुरवात झाली. महायुतीत आपसातच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले. शिंदेंच्या पक्षातील काही लोक भाजपात प्रवेश करत आहेत. यामुळे शिंदेंची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यामुळे शिंदेंचा खरा कसोटीचा काळ सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. २०२४ मध्ये म्हणावी तशी स्तिती त्यांच्या पक्षात नव्हतीच. सुरवातीला आपले मुख्यमंत्री पद द्यावे लागेले भले त्यांनी ते स्वखुशीने दिले असले तरीही त्यानंतरच्या खडामोडी याला वेगळे वळण देतात आणि आताच्या निवडणूकांमध्ये होणाऱ्या कुरघोडी देखील लपलया जात नाही आहेत.

आजही एकत्रतेचा नारा दिला असला तरी मुंबई वगळता अन्यत्र कुठेही एकत्र लढण्याची भाजपची मानसिकता नाही आणि तशी त्यांची गरजही त्यांना वाटत नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आत या सगळ्यातून शिंदे कसा मार्ग काढणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Paneer vs Tofu : पनीर खावे कि टोफू खावे; वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या